S M L

'सैराट' दाखवतो असं सांगून जेएनयूमधल्या विद्यार्थीनीवर बलात्कार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 22, 2016 05:14 PM IST

Rape victim

22 ऑगस्ट : 'सैराट' हा मराठी चित्रपट दाखवण्याचा बहाणा करून दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी जेएनयूमध्ये पीएच्. डी.च्या प्रथम वर्षात शिकत असून विद्यापीठातीलच एका विद्यार्थ्यावर तिनं बलात्काराचा आरोप केला आहे.

जेएनयूतील ब्रम्हपुत्रा हॉस्टेलमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. पीडित विद्याथच्नीनं आपल्या फेसबुक पेजवर 'सैराट' चित्रपटाची सीडी हवी असल्याची पोस्ट टाकली होती. तिच्या पोस्टला प्रतिसाद देत आरोपी अनमोल रतन यानं आपल्याकडे चित्रपटाची सीडी असल्याचं सांगितलं. त्यानंतर 'सैराट' चित्रपट पाहण्याच्या निमित्तानं अनमोलनं पीडित विद्यार्थीनीला त्याच्या हॉस्टेलमध्ये बोलावलं. पीडित तरुणी रूमवर गेली असता त्यानं कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध घालून तिला दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची कोणाकडे वाच्यता न करण्याची धमकीही त्यानं दिल्याचं पीडित तरुणीनं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.आरोपी अनमोल रतन हा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) या संघटनेचा कार्यकर्ता आहे. 'आयसा'नं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून अनमोलला निलंबित केलं आहे. या घटनेनंतर जेएनयूमधलं राजकारणही तापलं असून एबीवीपीने या घटनेच्या विरोधात जेएनयूमध्ये आंदोलनही केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2016 02:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close