पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2016 10:36 AM IST

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे

हा देश हिंसेपुढे झुकणार नाही, हा देश दहशतवाद, माओवादापुढे झुकणार नाही -पंतप्रधान

Loading...

गरीबी हे सार्क दशांसमोरचं आव्हान - पंतप्रधान

गरिबीपासून मुक्ती हे स्वातंत्र्य - पंतप्रधान

सामाजिक न्यायातूनच सशक्त समाज बनतो - पंतप्रधान

समाजविघातक तत्वांशी आपण सगळ्यांनी लढायला हवं - पंतप्रधान

पंडित दिनदयाल यांच्या स्वप्नांच्या पूर्तती करण्याचे दिवस - पंतप्रधान

तरुणांना रोजगार मिळावा ही आजची प्राथमिकता आहे - पंतप्रधान

गोष्टी टाळण्यावर आमचा विश्वास नाही, गोष्टींना भिडणं मी महत्त्वाचं मानतो - पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र यांच्या फायली आम्ही जाहीर केल्या - पंतप्रधान

देशाच्या जनतेला नेताजींविषयी जाणण्याचा अधिकार - पंतप्रधान

विविधतेतून एकता ही आपली सर्वात मोठी ताकद - पंतप्रधान

आपल्या देशाचं अखंडत्व आपल्या सांस्कृतिक वारशामुळेच - पंतप्रधान

सशक्त भारत सशक्त समाजाविना बनू शकत नाही - पंतप्रधान

सामाजिक न्यायावरच सशक्त भारताची निर्मिती होईल -पंतप्रधान

समाजविघातक तत्वांशी आपण सगळ्यांनी लढायला हवं - पंतप्रधान

जगभरात भारत हा लाडका देश आहे - पंतप्रधान

येत्या दहा वर्षांत जगात भारत हा तिसर्‍या क्रमांकाचा देश बनणार - पंतप्रधान

सरकारच्या कामाची ओळख होण्यापेक्षा देशाची ओळख सर्वदूर होण्यास प्राधान्य - पंतप्रधान

अहंकार लोकशाहीत चालत नाही -पंतप्रधान

हे आमच्या सरकारचं काम नाही असं म्हणून चालत नाही म्हणून मागच्या सरकारच्या काही योजना आम्ही पुढे नेल्यात - पंतप्रधान

स्पष्ट धोरणांमुळे आम्ही कठोर निर्णय घेऊ शकतो - पंतप्रधान

95 टक्के उसाची रक्कम चुकती केलेली आहे उरलेली आम्ही लवकरच देऊ - पंतप्रधान

पोस्टमन हे सरकार आणि सामान्य माणसातला दुवा - पंतप्रधान

बीएसएनल तोट्‌यात जात होतं त्याला आम्ही फायद्यात आणून दाखवलं - पंतप्रधान

भ्रष्टाचाराची चर्चा गेली अनेक वर्ष सुरू - पंतप्रधान

सरकारी खजिना खाली करण्याचं काम याआधीच्या सरकारने केले, पंतप्रधानांची आघाडी सरकारवर टीका

सरकारच्या कामाची ओळख होण्यापेक्षा देशाची ओळख सर्वदूर होण्यास प्राधान्य - पंतप्रधान

2022 पर्यंत शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं माझं स्वप्न - पंतप्रधान

डाळीचं संकट दूर कऱण्यासाठी शेतकरी पुढे आलेत -पंतप्रधान

आम्ही महागाईचा दर कमी करण्यात यशस्वी - पंतप्रधान

- आवाजवी दरात आपल्याला इंधन घ्यावं लागतं.

- कतार सोबत आम्ही चर्चा करुन भाव कमी करुन घेतले, ज्यानं 20 हजार कोटी रुपये वाचले.

आधिच्या सरकारच्या काळात महागाईचा दर 10 टक्यांपेक्षा जास्त होता, आम्ही तो 6 टक्यांपेक्षा जास्त होऊ दिला नाही -पंतप्रधान

आम्ही तो आणखी कमी करण्याचा प्रयत्न करतोय -पंतप्रधान

प्रधानमंत्री जनधन योजना ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. 21 कोटी कुटुंबाना आम्ही जनधन योजनेशी जोडलं -पंतप्रधान

भारतात एलईडी बल्ब 50 रुपयांत उपलब्ध करुन दिला - पंतप्रधान

आतापर्यंत 13 कोटी बल्ब वाटले गेले. 77 कोटी बल्ब वाटण्याचं ध्येय आहे - पंतप्रधान

सर्व भारतीयांनी घरात एलईडी बल्ब वापरावे, पंतप्रधानांचं आवाहन

आधार कार्डला सरकारी योजना जोडल्यानं जनतेला त्याचा फायदा झाला 70 कोटी जनतेला सरकारी योजनांशी जोडलं -पंतप्रधान

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत 14 कोटी जनतेला गॅस कनेक्शन मिळालं होतं -पंतप्रधान

आम्ही 60 आठवड्‌यात 4 कोटी जनतेला गॅस कनेक्शन मिळवून दिलंय ही आमची कामाची गती आहे -पंतप्रधान

 

एक वेळ होती,सरकारनं योजना घोषित केली तरही जनता खुश व्हायची, 70 वर्षांत जनता बदलली आहे.आता जनतेला पुरावे हवे असतात -पंतप्रधान

- आपल्याला कामाचा वेग वाढवावा लागेल -पंतप्रधान

प्रत्येक नागरिकाला योग्य रस्ते मिळणं त्याचा अधिकार आहे - पंतप्रधान

आज सगळ्या सरकारी रुग्णालयात ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था आहे - पंतप्रधान

उत्तरं देण्याची क्षमता सरकारमध्ये हवी -पंतप्रधान

केवळ जबाबदार सरकारच देशात बदल घडवू शकतं - पंतप्रधान

दोन वर्षाच्या काळात अगणित काम केली - पंतप्रधान

तळागाळातल्या माणसाच्या आयुष्यातला बदल हेच सुराज्य आहे -पंतप्रधान

सरकार संवेदनशील असलं पाहिजे -पंतप्रधान

सरकारच्या कार्यसंस्कृतीतकडे मला लक्ष वेधायचं आहे, केवळ नीती नाही तर नियतही महत्त्वाची आहे -पंतप्रधान

हे वर्ष संकल्प पर्व - पंतप्रधान

वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास - पंतप्रधान

स्वराज्याला सुराज्यात बदलणं हा संकल्प - पंतप्रधान

सरदार पटेल यांनी देशाला एकजूट केलं- पंतप्रधान

एकेकाळी सरकार आरोपांनी घेरलेलं असे पण आता काळ बदलला आता अपेक्षांनी सरकार घेरलेलं आहे -पंतप्रधान

दोन वर्षाच्या काळात अगणित काम केलं

pm_liveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू LIVE

समस्या असल्या तरी सामर्थ्यही आहे - पंतप्रधान

हे वर्ष संकल्प पर्व - पंतप्रधान

वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास - पंतप्रधान

स्वराज्याला सुराज्यात बदलणं हा संकल्प - पंतप्रधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2016 07:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...