'सरस छे', गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून छोट्या वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी ?

'सरस छे', गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून छोट्या वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी ?

  • Share this:

gujrat_tollगुजरात, 30 जुलै :  महाराष्ट्रातली जनता टोलमुक्तीच्या प्रतीक्षेत असताना शेजारच्या गुजरातमध्ये टोलमुक्ती दृष्टीक्षेपात आलीये. गुजरातमध्ये येत्या 15 ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आलीये. आनंदीबेन पटेल यांनी तशी घोषणा केलीये.

15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आलीये.

या निर्णयानं गुजरातमधील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. गुजरातमध्ये टोलमुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्रातली टोलमुक्तीचा मुद्दा उपस्थिती झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 12 टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला खरा पण गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात टोलच्या नावाखाली वाटमारी सुरू आहे. ही वाटमारी केव्हा बंद होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी आणि राज्यातल्या वाहनधारकांनी आणखी किती वर्षं टोल द्यायचा असा संतप्त सवाल विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2016 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...