वायू सेनेचं 'ते' विमान अजूनही बेपत्ता, 29 जणांची वाचण्याची शक्यता धूसर

  • Share this:

an_32_aircraftचेन्नई, 23 जुलै : भारतीय वायुसेनेच्या काल बेपत्ता झालेल्या विमानाचा अजूनही पत्ता लागलेला नाही. दुसरा दिवस उलटला तरी या विमानाचा शोध लागू शकला नाही. या विमानात 29 प्रवाशी होते. आता त्यांच्या वाचण्याची शक्यताही धूसर झाली आहे.

शुक्रवारी सकाळी एन-32 हे विमान पोर्ट ब्लेअरला जाताना बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालंय. त्यानंतर हाती घेण्यात आलेली शोध मोहीम अजुनही सुरुच आहे. शोधकार्याची कक्षा आता रुंदावण्यात आलीये. आता संपूर्ण भारतीय समुद्र हद्दीत शोधकार्य हाती घेण्यात

आलंय.

विमान एअरफोर्सचं असलं तरी नेव्ही आणि कोस्ट गार्डही पूर्णपणे शोधकार्यात उतरले आहे. आता खासगी मालवाहू नौकांनाही विमानाचे अवशेष दिसतायेत का ?, याकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आलंय. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर चेन्नईतल्या तांबरम हवाई दलावर पोहचले असून तिथे ते शोधकार्याचा आढावा घेतायेत. पण आज दुसरा दिवस उलटल्यानंतरही विमानाचा काहीही पत्ता लागला नसल्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याचं गुढ वाढलंय.

कसं आहे AN-32 हे विमान?

- हवाई दलात मालवाहतुकीसाठी वापर

- रशियन बनावटीच्या या विमानाचा 1984 मध्ये समावेश

- हवाई दलाकडे सध्या अशी 100 विमानं

- दोन इंजिन आणि कुठल्याही हवामानात उड्डाणाची क्षमता

- 50 प्रवासी आणि साडेसात टन माल वाहून नेण्याची क्षमता

- इंधन भरल्यानंतर 4 तास उड्डाण शक्य

- अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि लँडिंग सिस्टीम ही वैशिष्ट्यं

- काही वर्षांपूर्वी या विमानाला अपग्रेड करण्यात आलंय

 एएन-32 बद्दल..

- नाव : अँटोनोव्ह (एएन)-32

- इंजिन : 2

- संख्या : एअर फोर्सकडे 100 एएन-32

- कमाल वेग : ताशी 530 किमी

- क्षमता : पूर्ण इंधन भरल्यावर 4 तास उडू शकतं

- कंपनी : आव्हियांत (सोव्हिएत रशिया)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 23, 2016, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading