राज्यात उष्णतेची लाट

8 एप्रिलगेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. उन्हाच्या झळांनी विदर्भ-खान्देशासह मराठवाडा भाजून निघत आहे. नागपूर, चंद्रपूर वर्धा येथील तापमान गेल्या दोन दिवसांत 44 अंश सेल्सियसच्या आसपास आहे. पश्चिम महाराष्ट्रातही तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 डिग्रीने जास्तच आहे. थंड हवेच्या ठिकाणीही उष्म्याच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे दिसते. तर थंड पेयांच्या दुकानात गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. उत्तरेकडून येणार्‍या गरम आणि कोरड्या वार्‍यांमुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. थंड हवेचे महाबळेश्वरही तापले आहे. तर पुणे, नाशिकसारखी शहरेही तापली आहेत.एक नजर टाकूयात राज्यातील काही प्रमुख शहरांतील तापमानावर...शहरकमाल तापमान किमान तापमानअकोला 44.325 नागपूर 43.6 24.8मुंबई 34.0 23.2पुणे 40.3 21.8औरंगाबाद 39.8 24.6नाशिक 40.122. 5 सोलापूर 43.028कोल्हापूर 39. 7 25.0जळगाव 43.0 25.0रत्नागिरी 36.0 28.0महाबळेश्वर 35.2 22.9पणजी 34.1 25.8

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2010 08:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2010 08:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...