S M L

काश्मीर हिंसाचार: मृतांचा आकडा 30 वर, उच्चस्तरीय आढावा बैठक सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Jul 12, 2016 02:28 PM IST

काश्मीर हिंसाचार: मृतांचा आकडा 30 वर, उच्चस्तरीय आढावा बैठक सुरू

12 जुलै :  हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. काश्मीरमधील हिंसाचारात आतापर्यंत 30 जणांना जीव गमवावा लागला आहे. शेकडो जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे आफ्रिका दौर्‍याहून परतले. मायदेशी परत येताच मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपला काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती लक्षात घेऊन आपला निर्धारीत अमेरिका दौरा रद्द केला. अखिल भारतीय इमाम संघटनेच्या सदस्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. काश्मीर खोर्‍यात लवकरात लवकर शांतता बहाल करा, अशी विनंती त्यांनी सिंह यांना केली. दहशतवाद हा कोणत्याही रुपात असला तरी तो चुकीचाच आहे, असा पुनरुच्चार या इमामांनी केला.


गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात अशांतता कायम आहे. आजही श्रीनगरमध्ये कडकडीत बंद आहे. वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे. चौथ्या दिवशीही खोर्‍यातील सर्व 10 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मोठ्या रुग्णालयांत दाखल होणार्‍या जखमींची संख्या वाढतच आहे.

फुटीरवादी संघटनांनी काल पुन्हा एकदा दोन दिवसांच्या बंदची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीआरपीएफचे अतिरिक्त 1200 जवानही काल खोर्‍यात दाखल झाले आहे. काश्मीरमधले स्थानिक तरूण दहशतवादाकडे वळायला लागल्याने काश्मीर प्रश्न अधिक चिघळला आहे. हा प्रश्न आता राजकिय प्रश्न बनल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार आणि काश्मीर प्रश्नांवर युपीए सरकारने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2016 02:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close