चंद्र दर्शन न झाल्याने रमजान ईद उद्या ऐवजी गुरुवारी होणार साजरी

चंद्र दर्शन न झाल्याने रमजान ईद उद्या ऐवजी गुरुवारी होणार साजरी

  • Share this:

Jama Masjid EID

05 जुलै : मुस्लिम बांधवांचा सण ईद-उल-फित्र बुधवार 6 जुलै ऐवजी 7 तारखेला साजरा होणार आहे. आज चंद्र दर्शन न झाल्याने रमजान ईद उद्या ऐवजी गुरुवारी साजरी केली जाणार असल्याची दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी ही घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, भोपाळमध्येही याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार ऐवजी गुरुवारी 7 तारखेला ईद साजरी केली जाणार आहे.

दिल्लीत केंद्रीय कर्मचार्‍यांची ईद-उल-फित्रची सुट्टीही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. तर संबंधित राज्य सरकारांच्या निर्णयानुसार त्या-त्या राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांनी सुट्टी ठरवावी अशी मुभा देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 5, 2016, 9:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading