S M L

शपथ घेताना आठवले स्वता:चंच नाव विसरले !

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2016 01:30 PM IST

शपथ घेताना आठवले स्वता:चंच नाव विसरले !

दिल्ली 05 जुलै : रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये समावेश झालाय. आज राष्ट्रपती भवनात छोटेखानी सोहळ्यात आठवलेंनी मंत्रिपदाची शपथही घेतली. पण, शपथ घेत असताना 'मैं, रामदास बंडू आठवले' हे म्हणण्याचंच आठवलेंना विसर पडला. खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीच आठवलेंना नाव घेण्याची आठवणं करून दिली.

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा देत रामदास आठवले राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत युतीत दाखल झाले. पण, मागील विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंनी शिवसेनेची साथ सोडली आणि भाजपच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या या तपाचं फळ मिळालंय.

रामदास आठवलेंची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. आज राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आठवले नेहमीच्या स्टाईलपेक्षा जरा हटकेच तयार होऊन आले. डोक्यावर निळा फेटा, पिवळं जॅकेट आणि राखडी रंगाचा कुर्ता परिधान करून आठवले शपथविधी सोहळ्याला पोहोचले. महाराष्ट्रातील तमाम रिपाइं आणि दलित जनतेच्या नजरा आठवलेंवर खिळल्या होत्या. रमेश चंदप्पा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रामदास आठवले यांच्या नावाची घोषणा झाली.


आठवले जेव्हा शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर पोहोचले आणि शपथ घेण्यास सुरुवात केली. पण, मध्येच राष्ट्रपतींनी रामदास आठवलेंना थांबवलं आणि नाव घेण्याची सुचना केली. राष्ट्रपतींनी थांबवल्यामुळे गोंधळून गेलेले आठवले लगेच सावरले आणि त्यांनी 'मैं, रामदास बंडू आठवले' असं म्हणत शपथ घेतली. आठवले यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय भीम, जय भारत'चा जयघोष केला. आठवले जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हसून त्यांना दाद दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2016 12:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close