S M L

राष्ट्रीय पुरस्कारावर IBN लोकमतचा ठसा, पटकावले 8 NT अॅवॉर्ड्स

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2016 02:15 AM IST

राष्ट्रीय पुरस्कारावर IBN लोकमतचा ठसा, पटकावले 8 NT अॅवॉर्ड्स

दिल्ली - 29 जून : आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. राष्ट्रीय पुरस्कावर यंदाही आयबीएन लोकमतने आपली मोहर उमटवली आहे. तब्बल 8 एनटी इंडियन टेलिव्हिजन ऍवॉर्ड्स पटकावून आयबीएन लोकमतनं आपली घोडदौड कायम ठेवलीय.ibnlokmat_nt_awards3

दिल्लीत मोठ्या दिमाखात इंडियन टेलिव्हिजन ऍवॉर्ड्स पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यंदाही आयबीएन लोकमतने या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला. आयबीएन लोकमतच्या कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या 'वाचाल तर वाचाल' या कार्यक्रमाला 'बेस्ट टॉक शो'चा पुरस्कार मिळाला.

दर शनिवारी रात्री प्रसारित होणार्‍या आरती कुलकर्णी यांच्या 'जगाच्या पाठीवर' या कार्यक्रमास 'करंट अफेअर्स स्पेशल' पुरस्कार मिळाला.


मराठी चित्रपट सृष्टी असो की बॉलिवूड नगरी प्रत्येक सिनेन्यूजचा वेध घेणार्‍या आयबीएन लोकमतच्या शो टाइमसाठी अामच्या प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांना बेस्ट एंटरटेन्मेंट अँकरचा पुरस्कार मिळाला.

तसंच आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांच्या 'शो टाइम'मधल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला 'बेस्ट एंटरटेन्मेंट प्रोग्राम'चा पुरस्कार मिळाला.

आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना 'बेस्ट न्यूज रिपोर्टर'च्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराची यादी इथेच संपत नाही... 'भय इथले संपत नाही' या कार्यक्रमाला 'सोशल अवेअरनेस शो', तर 'खैरलांजी ते खर्डा' या कार्यक्रमाला 'न्यूज डॉक्युमेंट्री'चा पुरस्कार मिळाला.

Loading...

आयबीएन लोकमतला  राष्ट्रीय पुरस्कार

प्रणाली कापसे - बेस्ट न्यूज रिपोर्टर

नीलिमा कुलकर्णी - बेस्ट एंटरटेन्मेंट अँकर

बेस्ट न्यूज डॉक्युमेंट्री - खैरलांजी ते खर्डा

शो टाइम - चला हवा येऊ द्या - बेस्ट एंटरटेन्मेंट प्रोग्राम

वाचाल तर वाचाल - बेस्ट डिस्कशन शो

भय इथलं संपत नाही - बेस्ट सोशल प्रोग्राम

जगाच्या पाठीवर - करंट अफेअर्स स्पेशल

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2016 10:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close