कोल्हापूर बँकेच्या नुकसानीची जबाबदारी संचालकांवर

2 एप्रिलकोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीसाठी जबाबदारी सर्व आजी, माजी संचालकांवर टाकण्यात आली आहे. यात विद्यमान तसेच आजी, माजी आमदार खासदारांचा समावेश आहे. बँकेच्या प्राधिकृत आधिकार्‍यांनी आरोपपत्र तयार केले आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने यांचा यात समावेश आहे. के. पी. पाटील, सतेज पाटील, विनय कोरे, महादेवराव महाडिक यांच्यासह माजी आमदार नगसिंगराव पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी टाकण्यात आली आहे.बँकेच्या प्राधिकृत आधिकार्‍यांनी आरोपपत्र तयार केले आहे. आरोपपत्राची रक्कम 1 अब्ज 17 कोटी 68 लाख 25 हजार 450 रुपये इतकी आहे.दुसरीकडे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनी राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केल्याचा आरोप कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना मानणारा गट आहे. या गटाला हादरा बसावा आणि विलासराव देशमुख यांचा शिक्का पुसला जावा म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी ही कारवाई केल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2010 02:53 PM IST

ताज्या बातम्या