अलाहाबादमध्ये आजपासून भाजप कार्यकारिणीची बैठक

अलाहाबादमध्ये आजपासून भाजप कार्यकारिणीची बैठक

  • Share this:

Modicabinet

12 जून : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणूक पाहता भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठकीला आजपासून अलाहाबादमध्ये सुरूवात होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तसंच इतर नेते भाग घेतील. बैठकीत मंत्रिमंडळाचे वरिष्ठ सदस्य, भाजप सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार भाग घेणार आहेत. तसंच या बैठकीत उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा अजेंडा ठरवला जाऊ शकतो.

जर कोणतेही राज्य संसदेत भाजपला बहुमत मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरलं असेल तर ते उत्तरप्रदेश असल्याचं शाह यांनी अलिकडेच म्हटलं होतं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा होईल. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु मुख्य भर हा पुढच्या वर्षी होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर भर राहिल. मात्र मुख्यमंत्रपदाच्या उमेदवाराबाबत या बैठकीत चर्चा होणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 12, 2016, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading