आयएनएस विक्रमादित्यवर वायुगळती, दोघांचा मृत्यू

  • Share this:

ins vikramaditya10 जून : आयएनएस विक्रमादित्य या युद्ध नौकेवर वायगळती झाल्याची घटना घडलीये. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय.

विषारी वायू गळती झाल्याने एक जवान आणि एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील कारवार इथं ही घटना घडलीये.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात महाकाय अशी आयएनएस विक्रमादित्य दाखल झाली. कर्नाटकातील कारवार इथं विक्रमादित्यवर दुरस्तीचं काम सुरू आहे. या युद्धनौकेवर सीवेज ट्रिटमेंट प्लॉटमध्ये पाईप बदलण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी वायुगळती झाली. या दुर्घटनेत कर्मचारी राकेश कुमार आणि मोहनदास कोळंबकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत युद्धनौकेवरील दोन जवान आणि दोन स्थानिक कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नौदल प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2016 10:55 PM IST

ताज्या बातम्या