तिहार जेलमध्ये रचला जातोये छोटा राजनच्या हत्येचा कट?

 तिहार जेलमध्ये रचला जातोये छोटा राजनच्या हत्येचा कट?

  • Share this:

chota rajan_cbi

10 जून :  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मारण्यास आलेल्या चार हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघेही छोटा शकीलचे माणसं असल्याचं बोलल जात आहे.

भारताचा मोस्टवॉटेंड डॉन दाऊद इब्राहीमचा छोटा राजन दुष्मन आहे. राजन पोलिसांसमोर तोंड उघडू नये म्हणून दाऊद त्याला मारण्याचा कट रचत आहे. इंडोनेशियातून राजनला अटक केल्यानंतर सध्या त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलंय. यानंतर डी कंपनीकडून राजनला संपवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं कळतंय.

छोटा राजनची सुनावणी सध्या व्हिडिओ काँफरन्स होत आहे. कारण राजनला कोर्टात हजर केलं जातं असताना मारण्याचा करण्याचा कट या चौघांनी रचला होता, असं म्हटलं जात आहे. हे चौघेही सध्या तिहार जेलमध्येच असून, ते सतत छोटा शकीलच्या संपर्कात असल्याचं पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवा, असं जेल प्रशासनाला सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 10, 2016, 9:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading