'मोदी विमानतळावरच करतात अंघोळ', केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितलं कारण

'मोदी विमानतळावरच करतात अंघोळ', केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितलं कारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर विमानतळावरच विश्रांती घेतात आणि तिथंच अंघोळही उरकतात असं लोकसभेत सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावरून विरोधक नेहमीच गदारोळ करत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर विमानतळावरच विश्रांती घेतात आणि तिथंच अंघोळही उरकतात असं लोकसभेत सांगितलं. मोदी जेव्हा बाहेरच्या देशात जातात त्यावेळी इंधन भरण्यासाठी विमाने बराच वेळ थांबवाली लागतात. तेवढ्या वेळेत मोदी अंघोळ वगैरे करून घेतात. ते कधीच हॉटेलमध्ये विश्रांती करायला जात नाहीत असं गृहमंत्री अमित शहांनी सांगितले.

लोकसभेत एसपीजी विधेयकावरून गदारोळ झाला. गांधी कुटुंबीयांच्या एसपीजी सुरक्षाही काढून घेण्यात आली. दरम्यान, या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अमित शहांनी सांगितलं की, विमान इंधन भरण्यासाठी किंवा इतर कारणाने रात्रभर एखाद्या विमानतळावर थांबायचे तेव्हा पंतप्रधान हॉटेलमध्ये जायचे. पण मोदींनी मात्र याऐवजी हॉटेलमध्ये जाऊन विश्रांती घेतली नाही.

परदेश दौऱ्यात त्यांनी सोबत नेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही 20 टक्के कमी केली. तसेच सोबतच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र गाड्यांऐवजी एकत्र प्रवास करण्यासही सुचवलं. यामुळे लागणारी सुरक्षा व्यवस्था आणि इतर गोष्टींवर होणारा खर्च कमी झाला असंही अमित शहा म्हणाले.

देशात एसपीजी सुरक्षा पंतप्रधानांशिवाय गांधी कुटुंबातील तिघांना पुरवली जात होती. ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यानंतर आाता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

First published: November 29, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading