S M L

आजपासून सगळंच अर्ध्या टक्क्याने महाग, कृषी अधिभार लागू

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2016 12:11 PM IST

दिल्ली - 01 जून : सेवा करात आजपासून अर्धा टक्का वाढ अमलात येणार आहे. सेवा करात आजपासून कृषी कल्याण अधिभाराची भर पडणार आहे. त्यामुळे कालपर्यंत तुम्ही 14.5 टक्के सेवा कर भरत होतात, तो आजपासून 15 टक्के झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या अधिभाराची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे.

union budget hike43त्यामुळे हॉटेलमध्ये खाणं, मोबाईलचं बील, रेल्वे, विमान, बससेवा, जाहिराती,ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवा, रेल्वे आणि विमान तिकीट बांधकाम यासह अनेक सेवा आजपासून अर्ध्या टक्क्याने महाग होणार आहे. याआधी सरकारनं 0.2 टक्के स्वच्छ भारत अधिभार लावला होता. त्यात आता कृषी कल्याण अधिभाराची भर पडलीय. विशेष म्हणजे या अधिभारातून जमा झालेले पैसे केंद्र सरकारच्या फंडमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे किती पैसे जमा झाले, ते कृषी कल्याणावरच खर्च झाले का, हे कळायचा मार्ग नाही. कारण या फंडाचा हिशेब देण्यास सरकार कायदेशीररित्या बांधिल नसतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2016 09:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close