S M L

पुलगाव दारुगोळा स्फोटात घातपाताची शक्यता कमी - पर्रिकर

Samruddha Bhambure | Updated On: May 31, 2016 10:00 PM IST

parikar_pc

31 मे : पुलगाव स्फोटात घातपाताची शक्यता कमी असल्याचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं आहे. देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा असलेल्या वर्ध्यातील पुलगावमध्ये दारुगोळा भांडाराच्या अग्नितांडवात 16 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज कुमार यांच्यासह 1 लष्कराचा जवान आणि 13 अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे.

या स्फोटानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मनोहर पर्रिकर वर्ध्यात पोहोचले. यानंतर जखमींची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुलगाव स्फोटात घातपाताची शक्यता कमी असल्याचं सांगितलं. तसंच याप्रकरणी लष्कराला चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असंही पर्रिकर म्हणाले.लष्कराचे 2 अधिकारी, 1 जवान आणि अग्निशमन दलाच्या 13 जवानांनी आग पसरु नये म्हणून प्राण अर्पण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आजू-बाजूला असलेल्या 9 शेड्स वाजल्या. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले आहे. त्यापैकी 10 जवानांना उपचार करुन लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. तर 5 जण आयसीयूमध्ये असून 1 गंभीर जखमी असल्याची माहिती पर्रिकरांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2016 09:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close