आयसिसच्या रडारवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी, उकळणार होते खंडणी ?

आयसिसच्या रडारवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी, उकळणार होते खंडणी ?

  • Share this:

नवी दिल्ली - 25 मे : दहशतवादी कारवायाने हैदास घालणार्‍या आयसिसच्या रडारवर बॉलिवडूनगरी असल्याची माहिती समोर आलीये. भारतात सक्रीय असलेल्या आयसिसच्या विंगने बॉलिवडूच्या सेलिब्रिटींकडून खंडणी मागण्यासाठी तयारी केली होती अशी धक्कादायक माहिती अटकेत असलेल्या रिजवान नवाजुद्दीन उर्फ़ खालिद आणि मुद्दबिर शेख यांनी दिली.

isis_pune_atsआयसिसच्या भारतातल्या विंगनं बॉलिवूड सेलिब्रिटींकडेही खंडणी मागण्याची तयारी केल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडालीये. आयसिसच्या टॉप कमांडरच्या चौकशीत एनआयएला ही माहिती मिळाली आहे. अटक झालेल्या रिजवान नवाजुद्दीन उर्फ़ खालिद आणि मुद्दबिर शेख यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झालीय.

सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी बॉलीवूड स्टार्सना टार्गेट करण्याचं प्लॅनिंग केलं होतं. खंडणीसाठी प्लॅनिंग त्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये लखनऊ मोड्यूलच्या सदस्यांसोबत मीटिंगमधे केली होती. लखनऊमध्ये झालेल्या या मीटिंगमध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्यांकडून खंडणी मागणे आणि ट्रेनिंग लोकेशन बद्दलही चर्चा झाली होती.

आणि यासाठी पनवेल, चंदीगढ़, तामिळनाडू, कर्नाटकच्या जंगलामध्ये ट्रेनिंगचं प्लॉनिंग केलं होतं. याआधीही अंडरवर्ल्डकडून बॉलिवडू सेलिब्रिटींकडून खंडणी मागितल्याचे प्रकार घडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 25, 2016, 5:05 PM IST

ताज्या बातम्या