Elec-widget

दिल्ली विमानतळाजवळ शेतात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

दिल्ली विमानतळाजवळ शेतात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

  • Share this:

delhi_planदिल्ली - 24 मे : दिल्लीतील नजफगढ इथं एका एअर ऍम्ब्युलन्स विमानाने थेट शेतात इमर्जन्सी लँडिंग केलंय. अल केमिस्ट फार्म कंपनीचं हे विमान आहे. या विमानात 7 प्रवाशी प्रवास करत होते. या दुर्घटनेत 7 पैकी 5 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

एका रुग्णाला घेऊन पाटण्याहुन दिल्लीकडे रवाना झालेल्या एअर ऍम्ब्युलन्सने नजफगढमधील कैर गावात एका शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं. दुपारी 2.45 च्या सुमारास या विमानाने लँडिंग केलं. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले होते. दिल्ली विमानतळ 6 नॉटिकल मेल दूर राहिलं होतं. त्यामुळे  प्रसंगावधान राखत पायलटने एका शेतात हे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. या दुर्घटनेत सर्व जण सुरक्षित आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2016 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...