S M L

'नीट' सुटका, अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Sachin Salve | Updated On: May 24, 2016 02:04 PM IST

neet_examनवी दिल्ली - 24 मे : राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या म्हणजेच नीटच्या अध्यादेशावर आज (मंगळवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे सरकारी वैद्यकीय कॉलेजेसमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सर्व विद्यार्थ्यांना नीट आवश्यक करणार्‍या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशभर नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व राज्यांशी चर्चा करून केंद्र सरकारनं अध्यादेश काढून वर्षभर या निर्णयाला स्तगिती दिली. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्‍यांना मात्र नीट द्यावी लागणार आहे. सरकारनं अध्यादेश काढल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर अधिक स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी आज या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2016 01:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close