बाबरी, काश्मीर आणि गुजरातचा बदला घेऊ, आयसिसची धमकी

बाबरी, काश्मीर आणि गुजरातचा बदला घेऊ, आयसिसची धमकी

  • Share this:

ISISI Attack21 मे : आम्ही परत येऊ. मात्र, त्यावेळी आमच्या हातात तलवार असेल, आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ अशी धमकी आयसिस या दहशतवादी संघटनेनं दिलीये. भारताला धमकी देणारा आयसिस या दहशतवादी संघटनेचा 22 मिनिटांचा शुक्रवारी नवीन एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ एका इंग्रजी वृत्ताच्या हाती लागला असून या व्हिडीओत भारतात हल्ले करण्याची धमकी दिलीये.

या व्हिडिओत आयसिसमधील पाच दहशतवाद्यांच्या मुलाखती दाखविण्यात आल्या आहेत. या पाचजणांमध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ठाण्यातून पळून गेलेल्या फाहद तन्वीर शेख याचाही समावेश आहे. फाहद 2014 मध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी सिरियाला पळून गेला होता. मात्र, आता आपण अबू अमर अल-हिंदी असे टोपणनाव धारण केल्याचे फाहदने त्याच्या मुलाखतीत म्हटलं आहे. आम्ही परत येऊ. मात्र, त्यावेळी आमच्या हातात तलवार असेल, आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ, असे फाहदने या व्हिडिओत म्हटलं आहे. याशिवाय, त्याने गेल्यावर्षात बॉम्बहल्ल्यात मारल्या गेलेला त्याचा मित्र शहीम टंकी यालाही श्रद्धांजली वाहिली. फाहद, शहीम आणि आरिब माजिद हे तिघेजण ठाण्यात राहणारे असून 2014 मध्ये ते आयसिसमध्ये सामील होण्यासाठी घरातून पळून गेले होते. यापैकी आरिब माजिद हा काही दिवसांपूर्वी भारतात परतला असून सध्या एनआयएकडून त्याची चौकशी सुरू आहे. सुमारे 22 मिनिटांचा व्हिडिओ अरबी भाषेमध्ये आहे. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना यातून इशारा देण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओत ?

'आम्ही भारतात परत येऊ, त्यावेळेस आमच्या हातात तलवार असेल...आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमध्ये मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ... '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 21, 2016, 4:24 PM IST

ताज्या बातम्या