S M L

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाची 10 वैशिष्ट्य

Sachin Salve | Updated On: May 19, 2016 04:54 PM IST

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाची 10 वैशिष्ट्य

19 मे : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता राखलीये. त्यांचाबरोबरच तामिळनाडूमध्ये जयललितांनी दुसर्‍यांदा सत्ता काबिज केलीये. तर आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलीये. या निवडणुकीत मात्र, काँग्रेस आणि डाव्यांना चांगलाच फटका बसलाय. चार राज्यांमध्ये काँग्रेसचं पानिपत झालंय. तर पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा सलग दुसर्‍यांदा पराभव झाल्यामुळे चांगलाच हादरा बसलाय. या निकालाची ही 10 वैशिष्ट्य...

 निकालाची वैशिष्ट्य

1. आसाम - भाजप पहिल्यांदाच ईशान्य भारतात सत्ता स्थापन करणार2. दिल्ली, बिहारच्या पराभवानंतर अमित शाहांसाठी पहिली आनंदाची बातमी

3. आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचा भाजपला फायदा मिळाला

4. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूतही भाजपनं खाती उघडली

Loading...
Loading...

5. काँग्रेसची आसाम आणि केरळमधून सत्ता गेली, तामिळनाडू आणि बंगालमध्ये पराभव

6. काँग्रेसचं चारही राज्यांमध्ये पानिपत, राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणार

7. बंगालमध्ये दुसर्‍यांदा पराभव झाल्यानं डाव्यांच्या पुनरुज्जीवनावर प्रश्नचिन्ह

8. केरळमधली सत्ता मिळाल्यामुळे डाव्यांना दिलासा, 92 वर्षांचे अच्युतानंदन मुख्यमंत्री होणार

9. जयललिता, ममता या दोघींनी सत्ता राखल्यामुळे प्रादेशिक पक्षांची स्थिती देशात बळकट

10. तामिळनाडूत 1984 नंतर पहिल्यांदाच सत्ताधारी विजयी, जयांनी रचला विक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 04:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close