तामिळनाडूत पुन्हा 'अम्मा' राज, करुणानिधींचं स्वप्न धुळीस

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2016 03:20 PM IST

तामिळनाडूत पुन्हा 'अम्मा' राज, करुणानिधींचं स्वप्न धुळीस

19 मे : तामिळनाडूचा आखाडा कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पण, जयललितांंनी आपला दणका दाखवत एकहाती सत्ता राखली आहे. जयललितांच्या अण्णा द्रमुक पक्षाने सर्वाधिक 134 जागांवर आघाडी घेतलीये. जयललिता विरुद्ध करुणानिधी असाच हा सामना होता. या सामन्यात जयललीतांनी बाजी मारलीये. 93 वर्षी करूणानिधी यांच्या द्रमुकने 97 जागांवर आघाडी घेत विरोधी बाकावर बसणार आहे.

तामिळनाडूच्या आखाड्यात आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि द्रमुक आलटूनपालटून सत्तेवर विराजमान होण्याची परंपरा आहे. पण जयललीतांनी यंदा ही परंपरा मोडीत काढलीये. सलग दुसर्‍या वर्षी जयललिता सत्तेवर विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे जयललितांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. कारण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जयललितांची निर्दोष सुटका झाली असली तरी सुप्रीम कोर्टातला खटला प्रलंबित आहे. अम्मांनी लढाई जिंकली असली तरी काही जागांचा फटका बसलाय. मागील निवडणुकीत अण्णा द्रमुकने 150 जागा पटकावल्या होत्या. यावेळी त्यांच्या पदरात 134 जागा पडल्यात. अजूनही काही जागांवर आघाडी कायम आहे. तर दुसरीकडे 93 वर्षीय करुणानिधींनी सहाव्यांदा आपलं नशिब आजमावून पाहण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले.पण, त्यांना यावेळी पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर द्रमुक पराभूत झाला असला तरी द्रमुकने जोरदार मुसंडी मारलीये. मागील निवडणुकीत द्रमकला 23 जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी तब्बल 97 जागांपर्यंत द्रमुकने मजल मारलीये. पण तरीही सत्तेपासून पुढची 5 वर्ष दूर राहणं ही द्रमुकसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पण, आता द्रमुक विरोधी बाकावर बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close