S M L

पुण्यासाठी आणखी एका विमानतळाची गरज - मनोहर पर्रिकर

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2016 08:09 PM IST

 पुण्यासाठी आणखी एका विमानतळाची गरज - मनोहर पर्रिकर

15 मे : पुण्यासाठी आणखी एका विमानतळाची गरज आहे, पण संरक्षण विभाग यापेक्षा जास्त मान्यता देऊ शकणार नसल्याच संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं. पुणे विमानतळासंदर्भात आज संरक्षणमंत्री मनोहर पार्रीकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यात एक बैठक झाली. याबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताने ते बोलत होते.

त्याचबरोबर पुण्याच्या लोहगाव इथल्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15 एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून विमानतळाबाहेरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक परवानग्या 31 मे पर्यंत देण्यात येतील अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.


गेल्या दोन वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवासी संख्या 55 टक्क्यांनी वाढल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पुण्यामधून 55 लाख प्रवासी 66 शेड्युल्ड विमानांद्वारे प्रवास करतात. विमानतळ आणि हवाई दलाच्या सुरक्षेचा विचार करता एका निश्चित वेळेत विस्तारीकरणाचे काम पूर्ण करावं लागणार आहे. फेज 2 साठी पुढील 3 महिन्यात निर्णय घेऊन विस्तारीकरणाला सुरुवात करण्यात येईल. तर फेज एकमध्ये सध्याच्या विमानतळाच्या जागेत 30 ते 40 टक्क्यांची वाढ करणार आहोत. त्यासाठी 15. 84 एकर जमीन हवाई दल एअरपोर्ट एथोरिटीला भाड्याने देणार आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणा दरम्यान भूमिगत केबल आणि पाईपलाईन हलवण्याचं काम करावं लागणार आहे. सुरक्षेचा विचार करून हवाई दल, एअरपोर्ट एथोरिटी यांच्या अधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2016 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close