S M L

तेलंगणातील अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2016 05:07 PM IST

तेलंगणातील अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू

15 मे :  तेलंगणामध्ये टिपर ट्रक आणि ऑटो रिक्षा यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात राहणारे असल्याचे कळते. ते अदिलाबादच्या पोच्चम्मा मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.

तेलंगणामधील अदिलाबाद जिल्ह्यातील देगाव गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री हा अपघात घडला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील चौदा जण आणि तेलंगानाच्या दोघांचा समावेश आहे. सामानाचं वजन अंगावर पडल्याने 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारासाठी घेऊन जात असताना इतर दोघांनी आपला प्राण सोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2016 11:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close