गाडीला ओव्हरटेक केल्याने तरूणाची हत्या करणार्‍या आमदारपुत्राला अटक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 10, 2016 02:11 PM IST

गाडीला ओव्हरटेक केल्याने तरूणाची हत्या करणार्‍या आमदारपुत्राला अटक

Rocky yada

10 मे: गाडी ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून आदित्य या एकोणीस वर्षांच्या तरूणाची गोळ्या घालून हत्या करणार्‍या जदयू आमदारपुत्र रॉकी यादव याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

बिहारमधील विधान परिषदेत संयुक्त जनता दलाच्या आमधर मनोरमादेवी यांचा मुलगा आणि आरोपी रॉकी यादव हा हत्या केल्यापासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला बोधगयाजवळच्या मस्तपुरा गावातून त्याच्या वडिलांच्या फॅक्टरीमधून अटक केली. गयाचे पालीस अधीक्षक अवकाश कुमार यांनीही रॉकीच्या अटकेला दुजोरा दिला आहे. अटक करताना त्याच्याकडे हत्येदरम्यान वापरलेलं पिस्तुल आणि लँड रोव्हर गाडी सापडली असून पोलिसांनी दोन्हीही हत्यारे जप्त केली आहेत.

गया इथे गाडीला ओव्हरटेक केलं म्हणून रॉकीने 12 वीचा विद्यार्थी आदित्य सचदेव या 20 वर्षांच्या तरूणाची हत्या केली होती. गेल्या शनिवार रात्रीची ही घटना आहे, तेव्हापासून रॉकी फरार होता. त्यानंतर या भागात नागरिकांनी जोरदार निषेध करीत रॉकीच्या अटकेची मागणी केली होती. अटकेनंतर त्यानं स्वता: गुन्ह्याची कबुली दिलीय, असा दावा पोलिसांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2016 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...