देवभूमीत अग्नितांडव, आगीमुळे 3 हजार एकर जंगल नष्ट

देवभूमीत अग्नितांडव, आगीमुळे 3 हजार एकर जंगल नष्ट

  • Share this:

utrakhand02 मे : उत्तराखंडमधला वणवा काही विझायचं नाव घेत नाहीये. गेल्या 89 दिवसांपासून हा वणवा पेटलेला आहे. सध्या हा वणवा 5 जिल्ह्यांमध्ये पसरलाय आतापर्यंत 3000 एकर जंगल यात नष्ट झालंय.

केंद्र सरकारच्या अनेक यंत्रणा वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एनडीआरएफ आणि हवाई दलाचं पथक आग विझवण्यासाठी कार्यक करत आहे. एकूण 6 हजार जवान आणि अधिकारी आग विझवण्याच्या कामात व्यस्त आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी टाकण्यात येतंय. पण, त्याचा फार उपयोग होत नाहीये. हेलिकॉप्टर आगीच्या फार जवळ नेता येत नाही. शिवाय एका वेळी 5 हजार लिटर पाण्याचा मारा करता येतो. जंगलात रस्ते उपलब्ध नसल्यामुळे आगीचे बंबही तिथे पोहचू शकत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा आग नैसर्गिकरित्या विझण्याची वाट पहावी लागते.

दरम्यान, सिमल्याच्या भोवती जे जंगल आहे, त्यात ही वणवा पेटलाय. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा वणवा आणखी पसरला तर काय, ही भीती आता स्थानिकांमध्ये पसरलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 2, 2016, 9:15 AM IST

ताज्या बातम्या