मला अटक करून बँकांना पैसे मिळणार नाही -विजय मल्ल्या

मला अटक करून बँकांना पैसे मिळणार नाही -विजय मल्ल्या

  • Share this:

vijay_mallya29 एप्रिल : मला अटक करून बँकांना पैसे मिळणार नाहीयेत. मलाही हे प्रकरण एकदाचं संपवायचंय, असं वक्तव्य फरार उद्योजक विजय मल्ल्याने केलं. विजय मल्ल्याने ब्रिटनमधल्या प्रतिष्ठित फायनाशियल टाइमला मुलाखत दिली. मल्ल्याचा पासपोर्ट रद्द झालाय, आणि भारत सरकारनं त्याला फरार म्हणून घोषित केलंय.

मल्ल्या उवाच

- मला हद्दपार होण्यावाचून पर्याय नाही. माझा पासपोर्ट जप्त करून किंवा मला अटक करून बँकांना पैसे मिळणार नाहीयेत. मलाही हे प्रकरण निकालात काढायचंय. आम्हाला परवडेत ती आणि बँकांनाही चालेल, अशी एक संख्या ठरली पाहिजे. तेवढे पैसे मी भरेन. सध्या मी ब्रिटनमध्ये खूश आहे. मी भारतावर प्रेम करतो, मला तिरंगा फडकवण्याचा अभिमान आहे. माझा पासपोर्ट रद्द करण्यामागे पंतप्रधान मोदी आहेत असं मला अजिबात वाटत नाही. भारतातलं सरकार स्थिर आहे आणि याचा मला आनंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 29, 2016, 12:42 PM IST

ताज्या बातम्या