कुपवाडात दहशतवादी चकमक; 2 अतिरेक्यांना कंठस्नान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2016 12:50 PM IST

kupwara3

21  एप्रिल :  जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात आज (गुरूवारी) सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. लोलाब परिसरात चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली.

शोध मोहिम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 2 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मात्र, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची माहिती अजूनही मिळालेली नाही. ही कारवाई अजूनही सुरू असून अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2016 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...