17 एप्रिल : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात 80 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत उत्तर दिंजापूर 24, दक्षिण दिंजापूर 25.33, दार्जिलिंग 19, जलपैगुरी 20.45, माल्दा 18.32, अलिपूरदौर 20.66 तर बिर्घममध्ये 23.69 टक्के मतदान झाले होते.
सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी बिर्घम जिल्ह्यातील दिमृत गावात भाजप आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यात मारहाण झाली. दोन्ही पक्षाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तृणमुलचे सिलिगुरू विधानसभेचे उमेदवार बायचुंग भुतिया यांनी बोगस मतदानाची तक्रार केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv