लातूरला दररोज 10 लाख लिटर पाणी देण्याचा केजरीवालांचा प्रस्ताव

लातूरला दररोज 10 लाख लिटर पाणी देण्याचा केजरीवालांचा प्रस्ताव

  • Share this:

kejriwal_650__021214061612दिल्ली - 12 एप्रिल : दुष्काळाने होरपळणार्‍या लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आता लातूरकरांच्या मदतीसाठी दिल्ली सरकार पुढे सरसावलं आहे. दररोज 10 लाख लिटर पाणी देण्याचा प्रस्ताव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडला आहे.

लातूरला मिरजेहुन 5 लाख लिटर पाणी घेऊन पहिली वॉटर एक्स्प्रेस आज लातूरमध्ये दाखल झाली. आणखी काही दिवस लातूरला रेल्वेनं पाणी पुरवण्यात येणार आहे. लातूरकरांची तहान भागवण्यासाठी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लातूरला पाणी पाठवायची तयारी दर्शवलीये. लातूरच्या मदतीला दिल्ली सरकार तयार आहे, दररोज 10 लाख लिटर पाणी देण्याचा प्रस्ताव आहे, 2 महिने रोज 10 लाख लीटर पाणी देऊ असं ट्विट केजरीवाल यांनी केलंय. तर दुसरीकडे आधी दिल्लीला पुरेसा पाणीपुरवठा करा, मग लातूरला पाणी द्या असा खोचक टोला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 12, 2016, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading