Elec-widget

केरळ अग्नितांडवात मृतांची संख्या 109 वर

केरळ अग्नितांडवात मृतांची संख्या 109 वर

  • Share this:

keral_fireकेरळ - 11 एप्रिल : कोल्लम जिल्ह्यात मंदिरात फटाक्यांच्या साठ्याला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 109 वर गेलाय. फटाक्यांचे इतके भीषण स्फोट झाले की अनेक लोकांच्या अंगावर कॉक्रीटचे स्लॅब आणि लोखंडाचे ग्रील पडून मृत्यू झाला. बरेच लोक सकाळच्या बससाठी मंदिराच्या आवारात थांबले होते. केरळ सरकारनं या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्याची परवानगी नसतानाही मंदिर संस्थानानं फटाके फोडण्याचा कार्यक्रम रेटून नेला. या प्रकरणी विश्वस्तांवर हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

मोदींनी केली जखमींची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोल्लममध्ये जखमींची भेट घेतली. मोदींसोबत दिल्लीतल्या मोठ्या रुग्णालयातले डॉक्टर्सही होते. गरज पडली तर काही गंभीर जखमींना दिल्लीला नेऊन त्यांच्यावर उपचार करू, सध्या जे उपचार सुरू आहेत त्यावर आम्ही समाधानी आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले. जखमींमध्ये चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची संख्या जास्त आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोदींना फोन करून घटनेबाबत शोक व्यक्त केला.

राहुल गांधींनी घेतली जखमींची भेट

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही काल कोल्लमला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.त्यांनी या दुर्घटनेनंतर केरळ सरकारने केलेल्या मदतरकार्याची प्रशंसा केली. या आगीत जखमी झालेल्यांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. या दुर्घटनेत सापडलेल्या लोकांसाठी आपण जमेल ती मदत करायला तयार आहोत असं राहुल यांनी म्हटलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2016 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...