कोलकाता– 31 मार्च : कोलकत्यात बांधकाम सुरू असलेला फ्लायओव्हर कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मलब्याखाली अजून लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरु आहे.
आत्तापर्यंत 11 कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, 150 हून अधिक लोक अडकले असल्याची माहिती एका प्रत्यकदर्थीनं दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
हा फ्लायओव्हर गिरीश पार्क परिसरातील असून गणेश टॉकीजजवळ आहे. याठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे ढिगार्याखाली आणखी काही जण अडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे. तसंच एमडीआरएफच्या जवानांची 2 पथक बचावकार्यासाठी घटना स्थळी रवाना झालं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv