मीडिया मला टार्गेट करतंय, विजय मल्ल्यांचा आरोप

मीडिया मला टार्गेट करतंय, विजय मल्ल्यांचा आरोप

  • Share this:

vijay

मुंबई – 13 मार्च : देशातील 15 हून अधिक बँकांना 9 हजार कोटींचा गंडा घालून परदेशात पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्यानी आता ट्विटरवरुन टिवटिव करायला सुरुवात केली आहे. 'प्रसारमाध्यमं मला जाणून बुजून टार्गेट करत आहे, असा आरोप मल्ल्यांनी केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी विजय मल्ल्या यांनी ट्वीट करत आपण कामानिमित्त परदेशात आल्याचं सांगितलं होतं. तसंच, त्यात त्यांनी मी देशातून पळून गेलेलो नाही, असेही स्पष्ट केलं होतं. शिवाय, प्रसारमाध्यमांवरही टीका केली होती.

त्यानंतर आज पुन्हा त्यांनी ट्विट केलं असून प्रसारमाध्यमं मला जाणून बुजून लक्ष्य करत आहे. माध्यमं माझी शिकारं करण्याच्या तयारीत असल्यासारखं वागत आहेत. दुदैर्वाने, मला त्यांनी योग्य ठिकाणी शोधलं नाही.मला माध्यमांशी बोलण्यात काहीही रस नाही. त्यामुळे माध्यमांनी त्यांचे प्रयत्न वाया घालवू नये.

दरम्यान, मल्ल्या यांना ईडीने समन्स बजावलं असून, त्यांना 18 मार्चपूर्वी हजर राहण्यास सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 13, 2016, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading