S M L

तुम्हाला रिटायर व्हायचंय की करिअरची दुसरी इनिंग सुरू करायची?, कसं ते जाणून घ्या...

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2016 06:18 PM IST

तुम्हाला रिटायर व्हायचंय की करिअरची दुसरी इनिंग सुरू करायची?, कसं ते जाणून घ्या...

दूरदृष्टी असलेल्या भारताच्या युवाअधिकाऱयांच्या पिढीत आपलं स्वागत आहे... अशी पिढी जी पन्नाशीलाच साठी समजू लागली आहे! समज जशी बदलतेय तसे निवृत्तीच्या संकल्पनेतही मोठे सांस्कृतिक बदल होत आहेत...जसजशी लोकांची व्यावसायिक उद्दिष्टे वेगाने पूर्ण होतात आणि चाळिशीच्या आधीच ते मुख्य कार्यकारी अधिकारीसारख्या पदांपर्यंत पोहोचतात आणि अपेक्षेपेक्षा लवकरच निश्चित केलेला वित्तीय टप्पा गाठतात... अशा वेळेस या कॉपोर्रेट दळणाला त्यांना निरोप द्यावासा वाटला तर त्यात आश्चर्य वाटायला नको! घरापासून कारपर्यंत... त्यांच्या पालकांच्या पिढीच्या तुलनेत सारे काही... या एक्झिक्युटिव्ह वर्गाला खूपच लवकर मिळू लागले आहे.

नियोजन उत्तम हवे!

कुणीही निवृत्तीबाबतचा प्राथमिक विचार व्यक्त करताना साध्यासोप्या शब्दांत सांगतात, की निवृत्ती म्हणजे आपल्याला जे काही करावंसं वाटतंय ते करण्याची वेळ, जेव्हा करावंसं वाटतंय तेव्हा करण्याची वेळ, जिथे करावंसं वाटतं, तिथे करायची वेळ आणि जसं करावंसं वाटतं तसं करायची वेळ!


आजच्या जगात, अशा तऱहेचं आरामदायी आयुष्य केवळ नियोजनानेच शक्य बनते. धकाधकीच्या, टोकाच्या स्पर्धेतून बाहेर पडणं खरंच छान, पण नियोजन न करता तुम्ही नोकरी सोडलीत तर मात्र कमी मिळकतीत खर्च भागवण्याचे कौशल्य तुम्हाला शिकावे लागेल.

एका लष्करी अधिकाऱयाने आणि एका वित्तीय तज्ज्ञाने आपली दुसरी इनिंग पहिल्याइतकीच उत्तम कशी काय साधली हे जाणून घ्या...

रितेश खन्ना, 46

Loading...

Khanna-Ritesh-750x938'मी जेव्हा मोठा होत होतो, तेव्हा मला परेड आवडायची. त्यावेळी घरी टीव्ही असणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट होती, त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष सुरू असलेली परेड बघायला जायचो, जी माझ्याकरता चित्तथरारक बाब होती. जेव्हा काही वर्षांनी आमच्याकडे टीव्ही आला, तेव्हा कृष्णधवल प्रक्षेपण हीदेखील मेजवानीच होती...' लष्करात भरती होण्याविषयीची आठवण सांगताना रितेश सांगत होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये भरती होण्यात त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही.

'एनडीए'तील अत्यंत कठोर प्रशिक्षणानंतर त्यांच्या करिअरची सुरुवात पंजाबमध्ये झाली. भारतीय लष्कर अकादमीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या त्यांना एके-47 आणि घुसखोरांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हायला एक दिवस लागला.

आम्ही विचारले, 'ती मोहीम फत्ते झाली?' आम्ही विचारले. 'जर ती मोहीम यशस्वी झाली नसती तर मी इथे नसतो !' रितेश उत्तरले.

अकादमीतील आयुष्य नेहमीच्या महाविद्यालयीन जीवनापेक्षा खूपच वेगळे होते. 46 वर्षीय रितेशकरता लष्करातील आयुष्य हा नक्कीच थरारक अनुभव होता. आव्हानात्मक अनुभव आणि त्या अनुभवांना सामोरे जाण्याची रग हा उन्नतीकडे नेणारा मार्ग होता.

एक योद्धा असल्याने त्यांनी चिलखती सेनेत (आर्मर्ड कॉर्प्स) मध्ये रुजू होण्याचा मार्ग स्वीकारला. दहशतवादीविरोधी मोहिमांव्यतिरिक्त रितेश महत्त्वाच्या अशा सियाचेनच्या हिमनद्यांच्या प्रदेशातील तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांमध्येही सहभागी झाले होते.

लष्करात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सहाय्ययोजनांद्वारे त्यांनी उच्च शिक्षण घेण्यात स्वारस्य दर्शवले. 'मी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन विषयातून बी.टेक. पदवी आणि नंतर एम. टेक. ही पदव्युत्तर पदवी घेण्याचे ठरवले,' ते म्हणाले. ज्ञानात भर पडल्याने कोट्यवधी किमतीची अद्ययावत सामग्री हाताळण्याचा आत्मविश्वास त्यांनी संपादन केला. व्यक्तिगत आयुष्याच्या आघाडीवर मात्र, त्यांचे लग्न केल्यावर गोष्टी बदलायला सुरुवात झाली. 'मला लढण्याचे प्रशिक्षण मिळाले होते आणि नोकरीदरम्यान मी नेतृत्त्वक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य प्राप्त केले होते, मात्र दोन आणि त्याहून अधिक व्यक्तींच्या आयुष्याचे व्यवस्थापन जमण्यासाठी मला काही वेळ लागला,' ते सांगत होते.

एक पूर्ण परिवार आणि तुलनेने शिथिल नियोजन, यामुळे उन्हाळी सुट्ट्या, बदल्या आणि मुलांच्या शाळेच्या बदलीच्या वेळेस  पै पैचा हिशोब हे न चुकणारे प्रकरण बनले. एखादा जास्तीचा खर्च हा सारे आर्थिक नियोजन कोसळवणारा ठरू शकेल, अशी हातघाईची स्थिती ओढवली आणि तेव्हा रितेश यांना जाणवले की, जशा तऱहेने त्यांनी आजवर खर्च केला आहे, त्यात काहीतरी चुकलंय. त्यात काही पॅटर्न होता का?

पुढील सहा महिने, त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाने केलेला पै पैच्या हिशेबाची नोंद ठेवायला सुरूवात केली. शिस्त म्हणून नव्हे, तर केवळ खर्चाची नोंद व्हावी, हा त्यांचा उद्देश होता. बजेट आकाराला येण्याकरता सारे कुटुंब एकत्र आले आणि  मनाला वाटलं म्हणून केला जाणाऱया खर्चातून अत्यावश्यक खर्च वेगळे काढले.

'सेवेची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मी आणखी काही करू शकतो का, याची चाचपणी सुरू केली. 54 वर्षांनंतर सेवानिवृत्ती पत्करून निवृत्तीनंतर नोकरी करावी की मी माझ्या दुसऱया करिअरचे नियोजन करू हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. 2010 पर्यंत, नियमित बचत आणि स्मार्ट गुंतवणूक यांमुळे वित्तीय योजना आखून करिअरची दुसरी इनिंग सुरू करण्याचा आत्मविश्वास आला. काम करण्याचे माझे 10 वर्षांचे आयुष्य शिल्लक होते, त्यामुळे नवी उडी घेण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण ठरले नाही.'

त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता आणि पुढील तीन वर्षे स्वत:त गुंतवणूक करणे हे त्यांचे लक्ष्य होते.

सरकारी नोकरीतून कॉर्पोरेट क्षेत्रात स्थित्यंतर करताना रितेश यांनी दोन-तीन वर्षे त्यांच्या कुटुंबासाठी तीन गोष्टींच्या सुरक्षिततेवर खर्च केला...

1. मुलांच्या शिक्षणाचा खर्च.

2. घरभाडे.

3. दैनंदिन खर्च.

वेतनाचा धनादेश आला की त्यातून गुंतवणुकीची रक्कम आधी बाजूला काढण्याची रितेशची सवय त्याला उपयुक्त ठरली. 'जे तुमच्या आवाक्याबाहेर असेल त्यावर तुम्ही कसे खर्च करू शकता?' हसून ते म्हणतात.  नीट योजना आखून, त्यात वेळोवेळी योग्य ते बदल करून आणि सतत शिकून 2013 साली रितेश लष्कराचे बूट चढवून पुन्हा एकवार तयार झाले... मात्र, दुसरे आव्हान पेलण्यासाठी- भारतातील मानाच्या बिझनेस स्कूलमधील पदवी शिक्षणासाठी.

विशीत आणि तिशीत असलेल्या व्यक्तींना याच प्रकारचे आथिर्क नियोजन करून नवी उडी मारण्यासाठी रितेश दोन प्रकारचे सल्ले देऊ इच्छितात...

1. तुमच्या स्वत:च्या खर्चाचा ताळेबंद राखण्यापासून पळू नका.  असे केल्याने तुम्ही  स्वत:लाच मूर्ख बनवता. किती पैसे कुठे जातात, हे ध्यानात घ्या.

2. आपल्या पालकांसाठी गुंतवणुकीचे जे मयार्दित असे पारंपरिक पर्याय उपलब्ध होते, त्यापलीकडे पोहोचून तुमचे गुंतवणुकीचे क्षितीज अधिक विस्तारा. भाववाढ आणि कर यांत मूल्याची घसरण होऊ नये, याकरता उपाय शोधा. केवळ मुदत ठेवींवरील परिपक्वता मूल्य (मॅच्युरिटी व्हॅल्यू) लक्षात न घेता अंतिम परताव्यातील क्रयशक्ती लक्षात घ्या.

रवींद्र पाटील, 45

Untitled-2-750x1004कॉर्पोरेट क्षेत्रातून काढता पाय का घ्यावासा वाटला, हे विचारल्यावर क्षणाचाही विलंब न करता पाटील यांचे उत्तर आले- 'कुटुंबासाठी!. जितका वेळ जागा असायचो, त्यातील बहुतांश तास कार्यालयीन कामांत व्यतीत व्हायचे. कुटुंबियांसोबत अनुभव शेअर करणेही शक्य नसेल तर काय अर्थ आहे?'

जेव्हा तुमच्या मनात निवृत्तीचा विचार डोकावतो, तेव्हा निवृत्तीचे वय काय असावे हा प्रश्न नसतो तर तुमची किती मिळकत आहे, जी तुम्हाला निवृत्त व्हायची मुभा देते? हा प्रश्न खऱया अर्थाने उपस्थित होतो.

वाढणारे उत्पन्न, छोटे कुटुंब, उच्च जीवनशैली आणि उत्तम आरोग्य सुविधा यांमुळे भारतात निवृत्तीची व्याख्या बदलत चालली आहे. निवृत्तीचे चित्र जे एकटेपणाचे आणि अवलंबित्वाचे अशा तऱ्हेने रंगवले जात असे, त्यातील भयावहता आता पुसट होत चालली आहे. त्याऐवजी, निवृत्तीनंतर आता थरारक अशा दुसऱया इनिंगचे नियोजन करणे उत्तम ठरू लागले आहे. पुरेशा निधीची बचत आणि त्यातून येणारे आरामदायी परतावे यांमुळे निवृत्तीनंतरही हवी ती जीवनशैली राखणे शक्य बनले आहे.

रिटेल सेवा क्षेत्र जेव्हा नव्हाळीत होतं, तेव्हा पुणे विद्यापीठातून एमबीए झालेल्या पाटील यांनी वित्तीय क्षेत्रात पाऊल टाकलं. शॉपर्स स्टॉपचे प्रवर्तक असलेल्या के. रहेजा समूहात सहा वर्षे व्यतीत केल्यानंतर, स्थावर मालमत्तेच्या बाजारपेठेची उत्तम माहिती करून घेत पाटील यांनी या क्षेत्रात आपल्या करिअरचा पाया रचला. त्यांच्या नोकरीचा पुढचा थांबा हा आणखी एक मोठाली वित्तीय सेवा देणारा ब्रँड होता- जो घरांसाठी वित्तीय विभाग सुरू करीत होता. या ठिकाणी त्यांनी वित्तीय सेवेत एक नवी बाजारपेठीय परिसंस्था निर्माण करण्यास- कॉर्पोरेट व्यापाराला किरकोळ क्षेत्रात भांडवल गुंतवण्यास मदत केली.  त्यावेळेस त्यांनी अत्यंत आक्रमकपणे 'सेवा तुमच्या दारी' या 'ब्रँड मेसेज'ची जाहिरात करायला सुरुवात केली. त्यानंतर इतर अनेक ब्रँडसोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर ते अंतिमत: फ्युचर समूहाच्या वित्तीय सेवा विभागाचे उपाध्यक्ष बनले.

'या क्षेत्रातील काम हे मोहवणारे असते. मात्र, कामाचे तास हे तुमच्या वीकएंडचा वेळही खातात. व्यक्तिगत आयुष्यासाठी फारच थोडा वेळ तुमच्या हातात शिल्लक राहतो, त्यामुळे मी काम आणि व्यक्तिगत जीवन यांचा समतोल राखणाऱया दुसऱया मार्गाचा विचार करायला सुरुवात केली.' 45 वर्षांचे पाटील म्हणाले. महिन्याला ठराविक मिळकत हा मोठा अडखळा होता, तरीही पाटीलांनी किमान दोन-तीन वर्षे  आधीपासून निवृत्तीचे नियोजन करायला सुरुवात केली. 'मी माझ्या कुटुंबाला घर, मुलाची शैक्षणिक पॉलिसी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्यविषयक योजना या तीन आघाड्यांवर सुरक्षित ठेवेन, याबाबत माझ्या मनात सुस्पष्टता होती. नेमका दृष्टिकोन आणि बहुपेडी सल्ले प्राप्त करण्यासाठी माझ्या मित्रांचे आणि सहकाऱयांचे लवकर निवृत्ती स्वीकारण्याचे सल्ले मी अनेकदा धुडकावून लावले,' ते म्हणाले. वेगवेगळ्या योजनांशिवाय पाटील यांनी बचत आणि गुंतवणूक यांचे प्रमाण 40:60 राखायला सुरुवात केली.

' मिळकतीचा इतर स्रोत सुरू करण्याआधी सुमारे वर्षभर तरी कुठलेही नवे उत्पन्न नसेल हे लक्षात घेत मी त्याकरता तयारी करू लागलो.' वित्तीय सेवांच्या उत्तम ज्ञानाच्या जोरावर वेळेचा उत्तम उपयोग करीत त्यांनी याविषयीची सल्लासेवा अर्थात 'कन्सल्टिंग'ला सुरू केली. निवृत्तीला एका पूर्ण वेळ करिअरमध्ये परावर्तित करण्याऐवजी मी ठराविक काळासाठी वित्तीय उद्दिष्टे आखली. जर मी एक चतुर्थांश कमी साध्य करतो, तर मी पुढील वेळेस ती तूट भरून काढण्यासाठी अधिक वेळ देतो, पण मी त्यापल्याड पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. नाहीतर, त्यात काय अर्थ राहिला? मी माझे ग्राहकही स्मार्ट पद्धतीने निवडतो, जेणे करून चाकोरीत पुन्हा अडकता कामा नये. '

अशा पद्धतीच्या योजना आखू इच्छिणाऱया तिशीतल्या व्यक्तींसाठी पाटील यांचे तीन सल्ले आहेत

1. तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट्य नेमके कोणते? करबचत, तात्काळ परतावा की शिस्तबद्ध बचत...? तुमच्या उत्तरावर तुम्ही कोणती योजना स्वीकारायची हे अवलंबून आहे.

2. वेगवेगळ्या बँडमधून निवड करताना त्यांचे मागील काही वर्षांचे अहवाल लक्षात घेऊन मगच निवड करा.

3. तज्ज्ञांची आणि मित्रांची मते घ्यायला कचरू नका. छोट्या संवादांमधूनही वेगवेगळी माहिती हाती लागू शकते.

निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी आज बेसुमार उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध असली तरीही  HDFC Life Click 2 Retire  तुम्हाला महिन्याकाठचे उत्पन्न देऊन तुमच्या खर्चाचे नियोजन करण्यास मदत करते तसेच तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मॅच्युरिटीनंतर मिळणारे एक तृतीयांश रक्कम एकहाती काढण्याचाही पर्याय यांत उपलब्ध आहे. त्यासंबंधी  अधिक माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.here

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2016 03:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close