काळा पैसा परत आणणार्‍यांनी विजय मल्ल्याला देशबाहेर कसं जाऊ दिलं ? - राहुल गांधी

काळा पैसा परत आणणार्‍यांनी विजय मल्ल्याला देशबाहेर कसं जाऊ दिलं ? - राहुल गांधी

  • Share this:

rahul gandhi_4नवी दिल्ली - 10 मार्च : केंद्र सरकार काळा पैसा परत आणण्याबाबत गंभीर असेल तर विजय मल्ल्याला देशाबाहेर कसं जाऊ दिलं असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.

उद्योगपती विजय मल्ल्या कोट्यवधींचं कर्ज चुकवून परदेशी निघून गेल्यावर त्याचे पडसाद आता संसदेत उमटायला लागलेत. राज्यसभेत काँग्रेसने सरकारला या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जर कुणी गरीब कर्जबाजारी होतो तेव्हा त्याच्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी अनेक संस्थांना उभं केलं जातं. पण, विजय मल्ला सारख्या उद्योजकावर कोट्यावधीचं कर्ज असतांना त्याला देशाबाहेर जाऊच कसं दिलं असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

एकीकडे काळा पैसा परत आणण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे कर्जबुडव्यांना देशबाहेर जाऊ द्यायचं ही कोणती नीती आहे अशी टीकाच राहुल यांनी केली. तसंच त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. पंतप्रधानांनाच कोणत्या विषयावर चर्चा नको आहे. म्हणून मला बोलू दिलं जात नाही. मी, माझ्या भाषणात फेअर अँड लव्हली योजनेबद्दल विचारलं पण, मोदींनी दोन्ही सभागृहात या विषयावर बोलण्याचं टाळलं. मोदींनी इतर काही बोलण्यापेक्षा आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

तर दुसरीकडे. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सीबीआयने लूकआऊट नोटीस बजावलेली असतानाही मल्ल्या देश सोडून कसं जाऊ शकले असा प्रश्न विचारला. त्यावर मल्ल्यांनी आधीची कर्ज फेडलेली नसताना युपीएच्याच काळात त्यांना नवीन कर्ज दिली गेली असा टोला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लगावला. तसंच यूपीएच्या काळात आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी देशाबाहेर कसे गेले असं त्यांनी विचारलं.

दरम्यान, सीबीआयने मल्ल्यांविरूद्ध बजावलेल्या लूकआऊट नोटिसीत त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले गेले नव्हते. त्यामुळे इमिग्रेशन अधिकार्‍यांनी त्यांना अडवलं नाही अशी माहिती आयबीएन नेटवर्कला सूत्रांकडून कळली होती. जेटली यांनी संसदेत या बातमीला दुजोरा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 10, 2016, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading