S M L

सूर्यग्रहणाने इंडोनेशिया झाकोळले, भारतातूनही दर्शन

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2016 11:35 AM IST

सूर्यग्रहणाने इंडोनेशिया झाकोळले, भारतातूनही दर्शन

 08 मार्च : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज (बुधवारी) सकाळी भारतात हे सूर्यग्रहण आंशिक पाहायला मिळालं. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसलं. इंडोनेशिया, सुमात्रा, ऑस्ट्रेलियात सूर्यग्रहण स्पष्टपणे पाहायला मिळालं. देशात अनेक ठिकाणी सूर्योदयापूर्वीच सूर्यग्रहणाला सुरुवात झाली, त्यामुळेच ते दिसणं शक्य झालं नाही. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये मात्र, सूर्योदय लवकर होतो. त्यामुळे तिथे सूर्यग्रहण पाहता आलं.

प्रशांत महासागरातल्या मायक्रोनेशिया बेटांवर संपूर्ण सूर्यग्रहण दिसलं. सूर्यग्रहणाचं खास आकर्षण असलेल्या रिंगचं दर्शनही इथं झालं. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी हजारो नागरिक आणि पर्यटकांनी गर्दी केली होती. संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान ही हिर्‍याची अंगठी दिसणं हे दुर्मिळ दृष्य असतं. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र सरळ एका रेषेत येतात त्यावेळी संपूर्ण सूर्यग्रहण होतं. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो तेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो आणि त्याची किरणं फक्त सावलीच्या बाजूनं दिसतात. तेव्हाच हे अंगठीचं मनोहारी दृष्य दिसतं. अशावेळी भर दिवसाही अंधार होतो. त्याचं आकर्षण जगभरातल्या खगोलप्रेमींमध्ये असतं.इतर अनेक देशांमध्ये, विशेषत: प्रशांत महासागरामधल्या बेटांमध्ये मात्र सूर्यग्रहण दिसलं. ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये संपूर्ण सूर्यग्रहण दिसलं.इंडोनेशियात सकाळी 6 वाजून 19 मिनीटाला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र हळूहळू येऊ लागला. दरम्यानच्या 1 तासात चंद्राने सूर्याला व्यापून घेतले. हे दृष्ट पूर्वीकडील देशांतून दिसत होतं. मालुकु बेटांवर सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुमारे 10 हजार परदेशी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

तर ऑस्ट्रेलियातील काही भागातून आणि आशियातूस हे सूर्यग्रहण काही आंशिकच पाहता आलं. ईशान्य भारत, अंदमान निकोबार बेटांवर एक तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ हे ग्रहण दिसलं. याशिलाय सिलिगुडी, गुवाहटी, कूचबिहारी, पुरी, विशाखापट्टणण, चेन्नई आणि कन्याकुमारी यासह भारताच्या पूर्वेकडील राज्यात पाहायला मिळाले. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी ग्रहणाचे वेध लागले होते. पहाटे 5 वाजून 47 मिनिटांनी ग्रहणाची खग्रास अवस्था झाली. तर 9 वाजून 8 मिनिटांनी खग्रास अवस्था पूर्ण होऊन 10 वाजून 5 मिनिटांनी ग्रहण संपलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2016 10:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close