बिल गेट्स जगात तर मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत !

बिल गेट्स जगात तर मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत !

  • Share this:

CcegcANWIAAtVZd

02 मार्च : जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस यांनी 75 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे. फोर्ब्जने नुकत्याच जाहीर केलेल्या 2016च्या अब्जाधिशांच्या यादीत बिल गेटस् यांनी पुन्हा एकादा पहिलं स्थान पटकावलं आहे. तर रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ते या यादीत 36 व्या क्रमांकावर आहेत.

यंदाच्या यादीत अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 ने कमी आहे. यंदा या यादीत 1810 व्यक्तींचा समावेश आहे. सलग तिसर्‍यांदा बिल गेटस् या यादीत पहिल्या क्रमंकावर आहेत. अर्थात गेल्या 22 वर्षात 17 वेळा गेटस यांनी सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान मिळवला आहे. स्पेनचा अब्जाधीश आणि झारा कंपनीचा संस्थापक अमानसिअयो ओर्तेगा याने दोन नंबरवर नाव कोरले आहे तर पहिल्या पाचमध्ये वॉरेन बफेट, मेक्सिकोचा कार्लोस स्लीम, ऍमेझॉनचा सीईओ जेक बेजस यांचा समावेश आहे.

या यादीत एकूण 84 भारतीयांचा समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 20.6 अब्ज डॉलर्स आहे. त्यांच्या व्यतरिक्त दिलीप सांघवी, अझीज प्रेमजी, शिव नाडर, मित्तल, गौतम अडाणी, जंदाल, राहुल बजाज, नारायणमूर्ती, आनंद महिद्रा यांचा या यादीत समावेश आहे.

फोर्ब्स अब्जाधिशांची यादी

जागतिक यादी

1.         बिल गेटस्

2.         अमांसियो ऑर्टेगा

3.         वॉरेन बफे

4.         कार्लोस स्लिम

5.         जेफ बेझो

भारतीयांची यादी

36.         मुकेश अंबानी

44.         दिलीप शांघवी

55.        अझीम प्रेमजी

88.         शिव नाडर

135.        लक्ष्मी मित्तल

219.         सुनील मित्तल

453.         गौतम अदानी

722.         राहुल बजाज

959.         एन. आर. नारायण मूर्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 01:20 PM IST

ताज्या बातम्या