रोहितला वैद्यकीय मदत न मिळाल्याच्या स्मृती इराणी यांच्या दाव्याला सुरुंग

रोहितला वैद्यकीय मदत न मिळाल्याच्या स्मृती इराणी यांच्या दाव्याला सुरुंग

  • Share this:

Smriti irani

26 फेब्रुवारी : हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत खोटी माहिती दिल्याचं समोर आलं आहे. 'रोहितच्या आत्महत्येनंतर डॉक्टरांना तिथं जाऊ दिलं नव्हतं,' हा इराणी यांनी लोकसभेत केलेला दावा साफ चुकीचा असल्याचं महिला डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा वाद पुन्हा एकदा उफळणार आहे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी स्मृती इराणी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारची बाजू मांडली होती. 'रोहितच्या आत्महत्येनंतर त्याच्या शरीराजवळ कोणत्याही डॉक्टरला जाऊ दिलं नाही. रोहित जिवंत आहे की नाही हे कोणी पाहिलं नाही. त्याला वाचवण्याचा एकही प्रयत्न केला गेला नाही,' असा दावा इराणी यांनी तेलंगण पोलिसांच्या हवाल्यानं केला होता. मात्र, त्यांचा हा दावा हैदराबाद विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील महिला डॉक्टर एम. राजश्री यांनी फेटाळून लावला आहे.

'इराणी यांनी लोकसभेत चुकीची माहिती दिली आहे. रोहितच्या आत्महत्येच्या दिवशी मी ड्युटीवर होते. त्या घटनेची मिळताच मी हॉस्टेलला गेले होते. त्या दिवशी रोहितला एका पलंगावर झोपवण्यात आलं होतं. 15 मिनिटांनंतर पोलीस पोहोचले होते. संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी मीही घटनास्थळी पोहोचले आणि रोहितची तपासणी करून तो मृत झाल्याचं घोषित केलं होतं. मात्र त्याआधी काय झालं यासंदर्भात मला काही माहीत नाही,' असं डॉ. राजश्री यांनी म्हटलं आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2016 09:38 AM IST

ताज्या बातम्या