Elec-widget

रेल्वे भाडेवाढ नाही, सुविधांची हायटेक एक्स्प्रेस सुसाट

रेल्वे भाडेवाढ नाही, सुविधांची हायटेक एक्स्प्रेस सुसाट

  • Share this:

prabhu_in_loksabhaनवी दिल्ली - 25 फेब्रुवारी : 'सबका साथ, सबका विकास' असा नारा देत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपलं दुसरं रेल्वे बजेट सादर केलं.

रेल्वेभाडेवाढ न करता सुविधांवर भर देत सुरेश प्रभूंनी सर्वसमावेशक असं बजेट सादर करून भारतीय रेल्वेला वास्तवाच्या ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला. महिला सुरक्षा, अपंग, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि वायफाय, जीपीएस, ड्रोन अशा हायटेक सेवेचा कास धरत बजेटला नवी उभारी दिली. तसंच 2016 मध्ये 8,720 कोटींची बचतीची अपेक्षा ठेवत रेल्वेमंत्र्यांनी 2016 -17 साठी 1,21,000 कोटीची तरतूद केली आहे. तसंच 1,84,000 कोटींच्या महसूलाची अपेक्षाही सुरेश प्रभूंनी व्यक्त केली.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत चालू वर्षाचा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. रोहित वेमुला, जेएनयू प्रकरणामुळे विरोधकांनी मोदी सरकार टार्गेट केलंय. काल बुधवारी संसदेत या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या पार्श्वभूमीवर 'हम ना रुकेंगे हम ना झुकेंगे' असं म्हणत सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेटची सुविधांची एक्स्प्रेस सुसाट दामटली. अभ्यासपूर्वक आणि शेरोशायरीची प्रथा कायम ठेवत सुरेश प्रभूंनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली. सुरुवातील त्यांनी भारतीय रेल्वेपुढे खूप आव्हान आहे असं मान्य केलं. या आव्हानांना तोंड देण्याची गरज आहे. यासाठी सर्वसामान्यांचा विचार करूनच सर्वसमावेशक बजेट सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. 2016 मध्ये 8,720 कोटींची बचत अपेक्षित आहे. 2016 - 17 साठी 1,21,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 1,84,000 कोटींच्या महसूलाची आम्हाला अपेक्षा आहे असं प्रभू यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या वर्षी 92,714 कोटी रुपयांचे नवे प्रकल्प रेल्वे यावर्षी हाती घेणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली.

यावर्षीची रेल्वेतली गुंतवणूक गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये केलेल्या 139 घोषणांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रेल्वेला अधिकाअधिक उत्तन मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा महसूलात 10 टक्क्याने वाढ करण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलंय. रेल्वे स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने आमचा प्रयत्न आहे असं प्रभू यांनी स्पष्ट केलं. 2020 पर्यंत रेल्वेचा वेग सरासरी 50 किलोमीटर प्रतितास करण्याचा मानसही सुरेश प्रभूंनी व्यक्त केला. तसंच रेल्वे कारभारात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न कऱणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बजेटमधील महत्वाच्या घोषणा

Loading...

- रेल्वे विद्युतीकरणासाठी 50 टक्के अधिक निधी

- एलआयसी पुढच्या 5 वर्षांत रेल्वेमध्ये दीड लाख कोटींची गुंतवणूक करणार

- रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी येत्या 5 वर्षात 8.5 लाख कोटी उपलब्ध करुन देणार

- दरदिवशी सरासरी 7 किलोमीटर नवी रेल्वेलाईन बांधण्याच काम

- ईशान्येकडच्या राज्यांसाठी रेल्वेचं अधिक जाळ निर्माण करण्याचा प्रयत्न

- यावर्षी 1600 किलोमीटर मार्गावर विद्युतीकरणाचं ध्येय

- रेल्वे वाहतूक सागरी वाहतुकीला जोडणार

- स्वयंचलित रेल्वेफाटक हे आमचं 2020 पर्यंतचे लक्ष्य

- यंदाच्या वर्षासाठी 44 नवे प्रकल्प

- या वर्षअखेरपर्यंत 17,000 नवे बायोटॉयलेट बांधणार

- अपंगासाठी विशेष शौचालयांची सेवा

- ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थमध्ये 50 टक्के आरक्षण

- महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न

- गुगलची मदत घेऊन यावर्षी 100 स्टेशन्स वायफाय, पुढच्या वर्षी 400 स्टेशन्स वायफाय

- जनरल बोगीमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा देणार

- गर्दीच्या स्थानकांवर उदय ही केवळ रात्रीच चालणारी नवी रेल्वे

- प्रवाशांना स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

- मुलांसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये विशेष खाद्यपदार्थांची सोय

- लवकरच फोनरुन तिकीट रद्द कऱण्याची सेवा उपलब्ध करुन देणार

- रेल्वे स्थानकांमध्ये जीपीएस सेवा उपलब्ध करुन देणार

- हमालांना आता कुली ऐवजी सहाय्य या नव्या नावाने ओळखलं जाणार

- प्रत्येक श्रेणीत महिलांना 33 टक्के आरक्षण कोटा

रेल्वेत एफएम रेल्वे सेवा सुरू करणार

- रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवण्याची सोय

- रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2016 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...