मी कर्तृव्याचं पालन केलं, माफी मागणार नाहीच -इराणी

मी कर्तृव्याचं पालन केलं, माफी मागणार नाहीच -इराणी

  • Share this:

नवी दिल्ली - 24 फेब्रुवारी : रोहित वेमुल्ला आणि जेएनयू वादामुळे भाजपवर विरोधकांनी आरोपांचा आसुड ओढलाय. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांना धारेवर धरत लोकसभेत जोरदार पलटवार केलाय. रोहितच्या आत्महत्येचं राजकारण केलं गेलं. जेएनयू मुद्यावरही विरोधकांनी आपल्या पोळ्या शेकल्यात असा घणाघात करत स्मृती इराणी लोकसभेत भावूकही झाल्यात. मी तुम्हाला देशप्रेमाचं सर्टिफिकेट देत नाही, पण तुम्हीही माझ्या देशप्रेमावर शंका घेऊ नका असं आवाहनच त्यांनी विरोधकांना केलं. तसंच मी शिक्षणाचं भगवाकरण केलं नाही, एकाही कुलगुरूनं हे सांगितल्यास राजकारण सोडेन असं आव्हानच स्मृती इराणींनी काँग्रेसला दिलं.smruti_irani32

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अपेक्षेप्रमाणे ती वादळी ठरली. रोहित वेमुल्ला आत्महत्या प्रकरण, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशाविरोधात घोषणाबाजी प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलंच टार्गेट केलं. या प्रकरणावर आज लोकसभेत चर्चा झाली. सकाळच्या सत्रात काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहण्यास मिळाली. संध्याकाळी स्मृती इराणींनी आपली भूमिका स्पष्ट आणि रोखठोकपणे संसदेत मांडली. आक्रमक, भावूक आणि ठाम अशी भूमिका मांडत स्मृती इराणींनी विरोधकांना कडवं उत्तर दिलं.

रोहित वेमुल्लाच्या निलंबनाचा निर्णय ज्या समितीने घेतला ती समिती यूपीए सरकारने नियुक्त केली होती. त्या समितीत मी लोकांना नियुक्त केलं नव्हतं. पण त्या समितीत कुणी दलित नव्हतं त्यामुळे मी समितीच्या नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. मी मुलाला पाहिलं पण त्याची जात पाहिली नाही. माझं नाव स्मृती इराणी आहे. पण कुणी माझी जात सांगू शकत का ? असा सवालच लोकसभेत उपस्थित केला.

मला आजपर्यंत 66200 पत्र सर्वसामान्य लोकांकडून मिळाली त्यापैकी 61892 पत्रांचं समाधान केलं. ज्या पत्रांचं उत्तर मी दिलं त्यांना त्यांची जात विचारली नाही. मी फक्त माझं काम केलं. मला 12 फेब्रुवारी 2015 ला काश्मिरमधून एका विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती भेटत नाही असं पत्र लिहिलं आम्ही त्या विद्यार्थ्याला एक लाखांची फेलोशिप दिली आणि त्यांचं नाव इकबाल रसूलदार आहे असा खुलासाही त्यांनी केला. नारायण सामी यांच्या पत्राला उत्तर देत इराणी म्हणाल्यात, मी जे काम करत आहे त्याबद्दल माफी मागणार नाही, मी माझं कर्तृव्याचं पालन केलं याबद्दल माफी मागणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

शिक्षण क्षेत्राला युद्धभूमी बनवू नका, शिक्षण क्षेत्रात राजकारण करू नको. ज्या जेएनयूवरून वादंग सुरू आहे. त्या विद्यापीठात महिशासूराचा पुरस्कार करणार्‍या आणि दुर्गेवर आक्षेप या संघटनांनी घेतला. उमर खालीद आणि अनिर्रबन याने देशविरोधी घोषणा दिल्या हे सिद्ध झालंय. कन्हैय्याच्या संघटनांनी जे पोस्टर छापले, त्यात न्यायालय, राष्ट्रपती आणि संसदेवरच आरोप करण्यात आले आहे. आता तेच सुप्रीम कोर्टात जामिनासाठी दाद मागत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी हैदराबादला जाऊन आले. कारण त्यांना त्याचं राजकारण करायचं होतं. पण तेलंगाणा चळवळीत सहाशे मुलं मृत्यूमुखी पडली तेव्हा राहुल गांधी एकदाही का गेले नाही असा सवालही त्यांनी राहुल यांना विचारला.

Loading...

काश्मीरबद्दलही लहानपणापासून गैरसमजच पेरले जातात. त्यामुळे विद्यापीठात गेल्यावरही मुलं तेच शिकतात. इंदिरा गांधींनीही सत्ता गमावली होती. पण त्यांच्या मुलानं कधी भारतविरोधी नार्‍यांचं समर्थन केलं नाही. मी तुम्हाला देशप्रेमाचं सर्टिफिकेट देत नाही, पण तुम्हीही माझ्या देशप्रेमावर शंका घेऊ नका. मला या देश उभारणीत मदत करा, इतकीच माझी विनंती आहे असं आवाहनही इराणी यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2016 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...