S M L

शेळ्या विकून शौचालय बांधणार्‍या आजींचे मोदींनी धरले पाय!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 22, 2016 12:41 PM IST

शेळ्या विकून शौचालय बांधणार्‍या आजींचे मोदींनी धरले पाय!

छत्तीसगड - 22 फेब्रुवारी : छत्तीसगडमधील धामत्री जिल्ह्यात एका आजीबाईने आपल्याकडे असलेल्या घरात शौचालय बांधले आहे. 104 वर्ष वय असलेल्या आजीबाईच्या या निर्णयाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत आजीबाईच्या पाया पडत त्यांचं कौतूक केलं आहे. आजीबाईने या वयात घेतलेला निर्णय म्हणजे भारत बदलतोय याचीच ही सुरूवात असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

Loading...

धामत्री जिल्ह्यातील राहणार्‍या कुंवर बाईंनी (वय 104 वर्ष) 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' या योजनेंतर्गत देशात सुरू असलेल्या मोहिमेला प्रतिसाद देऊन घरात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, कुंवरबाईंचा हा निर्णय म्हणजे टीव्ही किंवा वृत्तमानपत्र वाचून घेतला नसून, गावकर्‍यांनी केलेल्या चर्चेतून आजीबाईंना स्वच्छ भारतसंबधी कळताच त्यांनी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.

शौचालय बांधण्यासाठी आजीबाईकडे पैसे नव्हते त्यावेळी 8 ते 10 शेळ्या विकून आलेल्या पैशातून शौचालय बांधले. आजीबाईचा हा निर्णय खरोखरच कौतूकास्पद असून अनेकांना प्रोत्साहित करण्यासारखा असल्याचंही मोदी म्हणाले. तसंच 'क्लिन इंडिया मिशन'अंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत देशातील घरा-घरात शौचालय बांधण्याचं आपले स्वप्न असल्याचंही यावेळी मोदींनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2016 11:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close