S M L

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात कॅप्टनसह 2 जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2016 08:37 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात कॅप्टनसह 2 जवान शहीद

श्रीनगर- 20 फेब्रुवारी :जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर इथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये एका कॅप्टनसह दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांनी नजीकच्या सरकारी इमारतीमध्ये आश्रय घेतला असून, अद्यापही चकमक सुरू आहे.

पाम्पोर इथे शनिवारी रात्रीपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 22 वर्षीय कॅप्टन पवन कुमार शहीद झाले आहेत. तर, अन्य 2 जवानही हुतात्मा झाले आहेत.


दरम्यान, हल्लेखोर ईडीआय कंपनीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर या कंपनीतील सर्व कर्मचाऱयांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीत तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यांची धरपकड करण्यासाठी लष्कराने संपूर्ण परिसर सील केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2016 01:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close