S M L

संघाची विचारधारा विद्यार्थ्यांवर लादू देणार नाही - राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Feb 18, 2016 04:48 PM IST

rahul gandhi_4नवी दिल्ली - 18 फेब्रुवारी : संघ आपली विचारधारा विद्यार्थ्यांवर लादत आहे. भाजपही संघाला पाठिशी घालत आहे पण भाजपची दडपशाही आम्ही चालू देणार नाही अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीये. तसंच देशप्रेम माझ्या रक्तात आहे, माझ्या परिवाराने या देशासाठी रक्त सांडलं आहे हेही लक्षात ठेवा असा प्रत्युत्तरही राहुल गांधींनी दिलं. जेएनयु विद्यार्थ्यांच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.

जेएनयू प्रकरणावरुन देशभरात वाद पेटलाय. राहुल गांधी यांनी जेएनयू विद्यार्थ्यांची भेट घेतल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवलीये. तर दुसरीकडे पटियाळा कोर्टाबाहेर वकिलांची हैदोस घालत कन्हैया कुमार आणि पत्रकारांना मारहाण केलीय. या प्रकरणी आज राहुल गांधी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मीडियाशी बोलतांना राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्ला बोल केला आहे.

आरएसएस आणि भाजप सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय. पण आम्ही असं होऊ देणार नाही असं या वेळी राहुल गांधी म्हणाले. जे सरकारच्या विरोधात बोलता त्यांना लक्ष बनवलं जात आहे. पण आम्ही सरकारला असा दबाव टाकू देणार नाही. एकीकडे सरकार लक्ष करतंय तर दुसरी संघ आपली विचारधारा लोकांवर लादत आहे. हे आम्ही कदापी होऊ देणार नाही. सरकारचं काम आहे विद्यार्थ्यांचं रक्षण करण्याचं पण इथं उलट होतंय अशी टीकाही राहुल गांधींनी केली.तर भाजपचे आमदार कैलास चौधरी यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला, त्यांना गोळ्या झाडा अशी टीका केली होती त्यालाही राहुल गांधींनी उत्तर दिलंय. देशप्रेम हे माझ्या रक्तात आहे. माझ्या परिवाराने या देशासाठी रक्त सांडलंय. जर कुणी देशाविरोधात बोलत असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे असं प्रत्युत्तर राहुल यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2016 04:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close