S M L

'जय श्रीराम'चे नारे देत शाहरुखच्या कारवर दगडफेक

Samruddha Bhambure | Updated On: Feb 14, 2016 02:44 PM IST

'जय श्रीराम'चे नारे देत शाहरुखच्या कारवर दगडफेक

अहमदाबाद - 14 फेब्रुवारी : बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान याच्यावर मोटारीवर रविवारी अहमदाबाद शहरात अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. या वेळी शाहरूखच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

शाहरूख सध्या ‘रईस’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरातमध्ये आहे. गुजरातच्या विविध भागात त्याचे चित्रीकरण सुरू आहे. रविवारी अहमदाबाद शहरात चित्रीकरण सुरू असताना अज्ञात समाजकंटकांनी शाहरूखच्या मोटारीवर दगडफेक केली. या वेळी शाहरूखच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.


यापूर्वीही चित्रीकरणासाठी भूजमध्ये गेलेल्या शाहरूखला स्थानिक नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. असहिष्णुतेबाबत विधान केल्यामुळे शाहरूखला गुजरातमध्ये तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच त्याच्या मोटारीवर दगडफेक केल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2016 02:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close