जेएनयूमध्‍ये देशविरोधी घोषणा, विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षाला अटक

जेएनयूमध्‍ये देशविरोधी घोषणा, विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षाला अटक

  • Share this:

hindustan-thursday-february-communism-against-sanjeev-students_eb2c7230-d132-11e5-94bd-a06a76346e8f

दिल्ली - 12 फेब्रुवारी : दिल्लीतलं प्रतिष्ठीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सध्या संघर्षाचं ठिकाण बनलं आहे. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. तर दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक अली जावेद यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं आहे. प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात भारतविरोधी नारेबाजी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक जावेदही प्रेस क्लबमध्ये उपस्थित होते.

अफझल गुरूला फासावर लटकवून तीन वर्षे झाली. जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातला अतिरेकी अफझल गुरूच्या आठवणीसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देशविरोधी नारे लावण्यात आले होते.पण, आपल्याला विनाकारण लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसंच अफझल गुरूच्या समर्थनासाठी झालेला कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता, त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संबंध नसल्याचा त्याचा दावाही त्याने केला आहे.

दरम्यान, जेएनयू संघटनेतल्या काही विद्यार्थ्यांनी त्याचा अफझल गुरू यांचा स्मृतिदिन पाळल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला आहे. त्यांनी इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला आणि आणि देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2016 10:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...