S M L

फेसबुकची 'फ्री बेसिक्स' मोहीम रद्द करत 'ट्राय' नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 8, 2016 07:15 PM IST

फेसबुकची 'फ्री बेसिक्स' मोहीम रद्द करत 'ट्राय' नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने!

नवी दिल्‍ली - 08 फेब्रुवारी : फेसबुकच्या फ्री बेसिक्स मोहिमेला टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) जोरदार दणका दिला आहे. फेसबुकची 'फ्री बेसिक्स' मोहीम रद्द करत ट्राय नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने उभी राहिली आहे. त्याचबरोबर मनमानी पद्धतीने इंटरनेटसाठी दर आकारता येणार नसल्याचंही ट्रायने स्पष्ट केलं आहे.

इंटरनेट डेटासाठी वेगवेगळे दर आकारल्यास टेलिकॉम कंपन्यांना 50 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या आकर्षक ऑफर देतात. मात्र, ट्रायने यावरही बंदी आणली आहे.ट्रायचा हा निर्णय म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. व्हॉट्स ऍप किंवा ट्विटरसाठी ठरावीक किमतीत डेटापॅक अशा स्वरुपाची ऑफर यापुढे देता येणार नाही. ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटशी जोडण्यासाठी फेसबुकने 'फ्री बेसिक्स'ची मोहीम सुरू केली होती. मात्र, मार्क झुकरबर्ग यांच्या महत्त्वाकांक्षी 'फ्री बेसिक्स' मोहिमेवर ट्रायने पाणी फेरलं आहे.

काय आहे फ्री बेसिक्स?

- ही सेवा कोणताही यूजर्स अँड्राइड स्मार्टफोनवर वापरू शकतो. फेसबुकने आधी ही सेवा internet.org या नावाने सुरू केली होती. मात्र ही सेवा नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात असल्याचं काही तज्ज्ञांचं मत होतं. या सर्व विरोधानंतर फेसबुकने internet.orgचं नाव Free Basics इंटरनेट असं केलं. internet.org ला 2014 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2016 06:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close