रोहितचा आज वाढदिवस, राहुल गांधींही आंदोलनात सहभागी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2016 02:17 PM IST

रोहितचा आज वाढदिवस, राहुल गांधींही आंदोलनात सहभागी

rohit_vemulaहैदराबाद - 30 जानेवारी : प्रशासन आणि समाजव्यवस्थेचा बळी ठरलेल्या हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाचा आज वाढदिवस असून त्याला आदरांजली वाहण्यासाठी विद्यार्थी जमा झाले आहे. त्याला आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले आहे.

हैद्राबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी हैद्राबाद इथं विद्यार्थांची निदर्शनं सुरू आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींसुद्धा आता या विद्यार्थ्यांसोबत उपोषणात सहभागी झाले आहेत. राहुल गांधी हे काल रात्रीपर्यंत या विद्यार्थांसोबत चर्चा करत होते. शिवाय रोहितच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली. राहुलच्या उपस्थितीमुळे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रोहित वेमुलाला आदरांजली वाहण्यासाठी हैदराबादमध्ये विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला. आज रोहितचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कुटुंबांसह मित्रांच्या मनात त्याचा आठवणीचे अश्रू दाटून येत आहेत.rahul_gandhi3

काय आहे प्रकरण

एबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि रोहित वेमुलाच्या सहकार्‍यांचा एका चर्चासत्रात वाद झाला होता. याकुब मेमनला फाशी देण्याच्या शिक्षेवरुन हे चर्चासत्र होते. या चर्चासत्रात रोहित सहभागी होता. त्याने फाशीच्या शिक्षेवर युक्तीवाद केला होता. त्यामुळे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत राडा घातला होता. रोहित आणि त्याच्या सहकार्‍यांनी याविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे तक्रारही केली.

पण, प्रशासनाने रोहित आणि त्याच्या सहकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला. विद्यापीठातच रोहित आणि त्याच्या सहकार्‍यांवर कँटिन असो अथवा लायब्ररीत जाण्यास मनाई करण्यात आलीये. या विरोधात आवाज उठवूनही प्रशासनाने कोणताही ठोस भूमिका घेतली नाही.

Loading...

अखेरीस रोहित वेमुलाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे. देशभरात दलित संघटनांनी रान पेटवले असून ठिकठिकाणी आंदोलन, निदर्शनं सुरू आहे. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी रोहितची आत्महत्या आणि दलित सवर्ण असा वाद नाही अशी भूमिका मांडली. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहितच्या आत्महत्येवर बोलतांना गहिवरून आले होते. एका आईने आपला पूत्र गमावलाय याचं दुख मी समजू शकतो अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशभरात आंदोलन होऊनही या प्रकरणी अद्याप चौकशीच सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2016 02:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...