S M L

राम मंदिर खुलं करणं ही राजीव गांधींची चूक होती - प्रणव मुखर्जी

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2016 01:52 PM IST

राम मंदिर खुलं करणं ही राजीव गांधींची चूक होती - प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली - 29 जानेवारी : राम जन्मभूमीवरचं मंदिर उघडणं ही राजीव गांधींची चूक होती असा खुलासा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलाय. तसंच शाह बानो खटल्यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करत नवा कायदा करणं, हे राजीव यांच्या पुरोगामी प्रतिमेला मारक ठरलं, असं प्रणव यांनी म्हटलंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झालाय आणि यात त्यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केली.

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या 'द टर्बूलेंट ईयर्स' आत्मचरित्रात बाबरी मस्सिदीवर भाष्य केलं. बाबरी मस्जिद पाडणं हे अत्यंत धोकादायक आणि लाजिरवाणी गोष्ट होती. या प्रकरणामुळे भारताच्या सहिष्णुतेला मोठा धक्का बसला. त्यानंतर ज्या घटना घडल्या, त्यानं काँग्रेस मत मिळवण्यासाठी धर्माचा वापर करतेय, हे स्पष्ट झालं, असं मत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं.

एवढंच नाहीतर बाबरी मस्जिदीला पाडण्यापासून वाचवता न येणं हे त्यावेळी नरसिंह राव यांचं मोठं अपयश होतं. नरसिंह राव यांनी त्यावेळची परिस्थिती पाहता उत्तरप्रदेशमधील एन.डी.तिवारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवायला हवी होती असंही त्यांनी म्हटलंय.


याच आत्मचरित्रामध्ये मुखर्जी यांनी 1984च्या ऑपरेशनब्लु स्टार बद्दलही लिहिलंय. जेव्हा इंदिरा गांधी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवण्याचा निर्णय घेत होत्या, तेव्हा मी त्यांना पुन्हा विचार करा, असं म्हटलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या, प्रणव, मला माहितीय मी काय करतेय. या निर्णयानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे माहित असूनही, देशाच्या भल्यासाठी त्यांनी तो कठीण निर्णय घेतला, असं प्रणव यांनी लिहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2016 01:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close