पहिल्या टप्प्यातल्या ‘स्मार्ट सिटी’साठी पुणे, सोलापूरची निवड

पहिल्या टप्प्यातल्या ‘स्मार्ट सिटी’साठी पुणे, सोलापूरची निवड

  • Share this:

Vyan naidu

नवी दिल्ली – 28 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेत देशातील 20 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये देशाची राजधानी नवी दिल्लीसह चेन्नई, भोपाळ, अहमदाबाद, सूरत आदी शहरांचा समावेश आहे. केंदीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये या शहरांची घोषणा केली.

देशातील 98 शहरांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. स्पर्धेतूनच केंद्रीय नगरविकास विभागाने या शहरांची निवड केली आहे. निवडीसाठी नेमलेल्या समितीने सर्वाधिक गुण भुवनेश्वरने दिलेल्या प्रस्तावाला दिले आहेत. त्यामुळे यादीमध्ये पहिल्या स्थानावर भुवनेश्वर आहे. दुसर्‍या स्थानावर पुण्याची निवड करण्यात आलेली असल्याचे व्यंकय्या नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

स्मार्ट सिटीच्या नियोजित कार्यक्रमानुसार पहिल्या वर्षी 20 शहरांची, तर दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात प्रत्येकी 40 शहरांचा समावेश करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शहरांना या योजनेमधून पाच वर्षांत 500 कोटी, तर राज्य सरकारकडून 250 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्र सरकार या शहरांवर सुमारे 96000 कोटी रुपये खर्च करणार आहे.

ही शहरं होणार स्मार्ट

1. पुणे

2.सोलापूर

3.भुवनेश्वर

4. विशाखापट्टणम

5. कोची

6. जयपूर

7. सुरत

8.अहमदाबाद

9.जबलपूर

10.दावणगिरी

11. इंदोर

12.दिल्ली

13.कोइम्बतूर

14.काकीनाडा

15.बेळगाव

16.उदयपूर

17.गुवाहाटी

18.चेन्नई

19.लुधियाना

20.भोपाळ

स्मार्ट सिटी म्हणजे काय ?

- राहणीमानाचा उत्तम दर्जा

- पर्यावरणाचं संवर्धन

- 24 तास पाणी आणि वीजपुरवठा

- घनकचर्‍याचं व्यवस्थापन

- हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना

- शहरात हवे जास्तीत जास्त हरितपट्टे

- कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक

- इंटरनेट कनेक्टिव्हिटी

- ई गव्हर्नन्स आणि प्रशासनात नागरिकांचा सहभाग

- नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 28, 2016, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading