S M L

पासपोर्ट आता मिळणार फक्त आठ दिवसांतच !

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2016 11:42 AM IST

पासपोर्ट आता मिळणार फक्त आठ दिवसांतच !

नवी दिल्ली - 28 जानेवारी : परदेशात जायचंय म्हणजे पासपोर्ट हवाच. पण हाच पासपोर्स मिळवण्यासाठी आधी लांबलचक रांगेत उभं राहायला लागायचं. पण, आता फक्त आठदिवसांमध्येच पासपोर्ट तुमच्या हाती मिळणार आहे.

passport_3

वेगवेगळ्या कागदपत्रांची पुर्तता आणि पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी कित्येकदा चकरा माराव्या लागत होत्या. पण, आता पासपोर्ट काढणं सोपं होणार आहे. परराष्ट्र खात्यानं याविषयी एक महत्तवपू्र्‌ण निर्णय घेतलाय. नव्या प्रक्रियेनुसार आठवड्याभरात पासपोर्ट मिळणार असून यासाठी फक्त चार कागदपत्रांच्या आधारे प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि ऍनेक्सर I फॉर्मवर प्रतिज्ञापत्र यांचा समावेश आहे. पासपोर्टसाठीच्या मुलाखतींसाठीही कमी वेळ लागणार आहे. तसंच यासाठीचं मुल्यही माफक असेल. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Loading...

आणि टि्वटवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2016 11:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close